TRENDING:

VIDEO : 12 बॉल 52 धावा, 19 वर्षाच्या पोराने घाम फोडला, गोलंदाजांची पिसं काढली

Last Updated:

क्रिकेटच्या वर्तुळात कोण कशी कामगिरी करून याचा काही नेम नाही. कारण क्रिकेटमध्ये लहान वाटणारी पोरं मोठ मोठे रेकॉर्ड करताना दिसत आहे. आता एका 19 वर्षाच्या खेळाडूने वादळी खेळी केली आहे. या खेळाडूने 65 बॉलमध्ये 98 धावांची नाबाद खेळी केली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
lhuan de pretorius
lhuan de pretorius
advertisement

Lhuan-dre Pretorius : क्रिकेटच्या वर्तुळात कोण कशी कामगिरी करून याचा काही नेम नाही. कारण क्रिकेटमध्ये लहान वाटणारी पोरं मोठ मोठे रेकॉर्ड करताना दिसत आहे. आता एका 19 वर्षाच्या खेळाडूने वादळी खेळी केली आहे. या खेळाडूने 65 बॉलमध्ये 98 धावांची नाबाद खेळी केली आहे. विशेष म्हणजे त्याला शेवटच्या बॉलवर दोन धावा काढून शतक पुर्ण करता आले असते. पण त्याचे हे शतक हुकले आहे.

advertisement

खरं तर या 19 वर्षीय खेळाडूचे नाव लुहान ड्री प्रिटोरीयस आहे.तो सध्या साऊथ आफ्रिका टी20 लीगमध्ये खेळतो आहे. या लीगमध्ये आज त्याच्या पार्ल रॉयल संघाचा एमआय केपटाऊन सोबत सामना होता.या सामन्यात पार्ल रॉयलकडून लुहान ड्री प्रिटोरीयस आणि असा ट्राईब सलामीला उतरले होते.यावेळीदोघांना संघाला चांगली सूरूवात करून दिली होती. दोघांनी 100 धावांची पार्टनरशीप केली होती. यावेळी असा ट्राईब 51 धावांवर बाद झाला.

advertisement

असा ट्राईब बाद झाल्यानंतर विकेटची एका मागून एक रांग लागली. पण लुहान ड्री प्रिटोरीयस मैदान सोडले नाही. त्याने एका बाजूने वादळी सूरू ठेवली.अशाप्रकारे तो 98 धावांपर्यंत पोहोचला होता.त्याला शतक ठोकायला एक बॉलमध्ये 2 धावांची आवश्यकता होती. त्यावेळेस त्याला बॉल मारता आला नाही आणि त्याचे शतक हुकले.अशाप्रकारे तो 65 बॉलमध्ये 98 धावा करून तो नाबाद राहिला. या खेळीत त्याने 10 चौकार आणि 2 षटकार मारले होते. अशाप्रकारे त्याने 12 बॉलमध्ये 52 धावा काढल्या होत्या.

advertisement

दरम्यान लुहान ड्री प्रिटोरीयसच्या 98 धावांच्या नाबाद खेळीच्या बळावर पार्ल रॉयल 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 181 धावा केल्या होत्या.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
'मुलांना न्याय मिळाला पाहिजे, अन्यथा मी..',जरांगे यांनी MPSC आंदोलनात दिला इशारा
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
VIDEO : 12 बॉल 52 धावा, 19 वर्षाच्या पोराने घाम फोडला, गोलंदाजांची पिसं काढली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल