TRENDING:

Maharashtra Kesari : सहा मिनिटांचा थरार, सिकंदर शेख जीव तोडून लढला, पण नवख्या महेंद्रने आस्मान दाखवलं,VIDEO

Last Updated:

तमाम कुस्तीप्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेल्या सिकंदर शेखची हार झाली आहे. विशेष म्हणजे सहा मिनिटांच्या या थरारक सामन्यात काय काय घडलं? सिकंदर शेखचा नेमका पराभव कसा झाला? हे जाणून घेऊयात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Kesari 2026,Mahendra Gaikwad vs Sikandar Shaikh : पुण्यातील वाघोली येथे रामकृष्ण सातव पाटील यांच्या वतीने आयोजित 68 व्या महाराष्ट्र केसरी 2026 स्पर्धेत किताब गटातील अंतिम फेरीत कुस्तीप्रेमींना अनपेक्षित असा निकाल लागला आहे.कारण तमाम कुस्तीप्रेमींच्या गळ्यातली ताईत असलेल्या सिकंदर शेखची हार झाली आहे. विशेष म्हणजे सहा मिनिटांच्या या थरारक सामन्यात काय काय घडलं? सिकंदर शेखचा नेमका पराभव कसा झाला? हे जाणून घेऊयात.
Maharashtra Kesari 2026,Mahendra Gaikwad vs Sikandar Shaikh
Maharashtra Kesari 2026,Mahendra Gaikwad vs Sikandar Shaikh
advertisement

सोलापूरचा 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीचा 'चपळ चिता' सिकंदर शेख या दोन्ही दोन्ही मल्लांनी पहिल्या मिनिटापासून आक्रामक सूरूवात केली होती.यावेळी 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखने ताबा मिळवत दोन गुण पटकावले.त्यानंतर स्टेपआऊट करून महेंद्र गायकवाडला एक गुण पटकावून 3 गुणांची आघाडी घेतली होती.पहिल्या फेरीत महेंद्र गायकवाड 3 गुण सिकंदर शेख शुन्य गुणावर होता.पहिल्या तीन मिनिटात महेंद्र गायकवाडने सिकंदर शेखला एकही गुण होण्याची संधी दिली नाही.

advertisement

दुसऱ्या फेरीत सिकंदर शेखने गुण मिळवण्याचा प्रयत्न केला.पण बाहुबली असलेल्या महेद्र गायकवाडने सिकंदरला दोन्ही फेऱ्यात एक गुण घेऊ दिला नाही. आणि शेवटी 'बाहुबली' महेंद्र गायकवाडने हिंगोलीच्या सिकंदर शेख 3-0 असा पराभव केला होता. विशेष म्हणजे सिकंदर शेख माजी महाराष्ट्र केसरी विजेता असला तरी नवख्या असलेल्या महेद्र गायकवाडने चितपट केलं होतं.त्यामुळे अशा नवख्या खेळाडू विरूद्ध एक गुण न पटकावता त्याची हार झाली आहे.

advertisement

विजेत्यांवर बक्षिसांचा पाऊस 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुणेकर इंजिनिअरची कमाल, कचऱ्यातून बंपर कमाई, ‘त्या’ वस्तूंना अमेरिका ते दुबई जगभरात डिमांड! Video
सर्व पहा

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Maharashtra Kesari : सहा मिनिटांचा थरार, सिकंदर शेख जीव तोडून लढला, पण नवख्या महेंद्रने आस्मान दाखवलं,VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल