TRENDING:

महाराष्ट्र केसरी जिंकणारा पैलवान होणार मालामाल, काय-काय मिळणार बक्षीस? रक्कम ऐकून थक्क व्हाल

Last Updated:

Maharashtra Kesari: संपूर्ण कुस्ती क्षेत्राचं आणि क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार आहे. हा सामना जिंकणाऱ्या पैलवानावर बक्षीसांचा पाऊस पडणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Maharashtra Kesari: संपूर्ण कुस्ती क्षेत्राचं आणि क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून असलेल्या ६८ व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना होणार आहे. पुण्याच्या वाघोली येथे रामकृष्ण अण्णा सातव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या प्रतिष्ठित स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचा नवीन 'महाराष्ट्र केसरी' कोण ठरणार? याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
News18
News18
advertisement

अंतिम लढतींचे समीकरण

आज वाघोलीत मॅट आणि माती अशी दोन प्रकारची कुस्ती पार पडणार आहे. मॅट विभागात माजी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि जय पाटील यांच्यात चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. तर माती विभागात सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यात थरार रंगणार आहे. हे चारही मल्ल फायनल सामन्यात पोहोचले आहेत. त्यामुळे या दोन्ही विभागात महाराष्ट्र केसरी कोण ठरणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. याचं काऊंटडाऊन आता सुरू झालं आहे.

advertisement

विशेष म्हणजे, सिकंदर शेख आणि हर्षवर्धन सदगीर हे दोन्ही मल्ल यापूर्वी एकदा 'महाराष्ट्र केसरी' झाले आहेत. त्यामुळे यापैकी जो मल्ल बाजी मारेल, तो 'डबल महाराष्ट्र केसरी' होण्याचा बहुमान मिळवू शकतो. महाराष्ट्र केसरी जिंकणाऱ्या मल्लावर बक्षिसांचा वर्षाव होणार आहेत. लाखो रुपयांचं बक्षीस त्यांना मिळणार आहे.

विजेता मल्ल होणार मालामाल

यंदाच्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील विजेत्या मल्लावर बक्षिसांची मोठी खैरात होणार आहे. विजेत्या पैलवानाला विविध पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे. यात कुस्ती क्षेत्रातील सर्वात प्रतिष्ठेचा सन्मान असलेली मानाची गदा विजेत्या मल्लाला दिली जाणार आहे. यावेळचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विजेत्याला आलिशान फॉर्च्युनर गाडी देण्यात येणार आहे. त्याच बरोबर ५ लाख रुपयांचं रोख बक्षीस देखील देण्यात येणार आहे.

advertisement

त्यामुळे अंतिम सामन्यात कमालीची चुरस बघायला मिळायला मिळू शकते.या बक्षीस वितरण समारंभासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, त्यांच्या हस्ते विजेत्याला मानाची गदा दिली जाणार आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा रोमांचक झाली होती. कारण या स्पर्धेत ५ माजी महाराष्ट्र केसरींचा सहभाग होता. यात अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले असून शिवराज राक्षे, पृथ्वीराज पाटील आणि गतविजेता पृथ्वीराज मोहोळ यांना स्पर्धेच्या सुरुवातीलाच पराभवाचा धक्का सहन करावा लागला. आता महाराष्ट्राचा नवा महाराष्ट्र केसरी कोण होणार आणि ही मानाची गदा कोणाच्या खांद्यावर विसावणार? हे पाहण्यासाठी काही तासांची प्रतीक्षा उरली आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
महाराष्ट्र केसरी जिंकणारा पैलवान होणार मालामाल, काय-काय मिळणार बक्षीस? रक्कम ऐकून थक्क व्हाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल