घरातून मिळालं बाळकडू
"वय वर्ष पाच असल्यापासून मी खेळामध्ये आहे. माझ्या घरातूनच मला हे बाळकडू मिळालं आहे. म्हणजे माझे वडील स्वतः हा बॉक्सर मेडिलिस्ट आहेत आणि माझा भाऊ फुटबॉल प्लेअरं आहे. मी लहान असल्यापासूनच त्यांनी मला खेळात टाकलं होत. मग तिथूनच सुरुवात झाली. 2009 मध्ये प्रथमच भारताचं प्रतिनिधित्व केलं. ज्युनियर एशियन चॅम्पियनशीप मलेशिया मध्ये झाली होती. तेव्हा गोल्ड मेडल मिळालं होत," असं स्नेहल सांगते.
advertisement
दडपणाचा 'तो' क्षण, मात्र त्यावरही मात; नागपूरच्या ओजसनं सांगितला एशियन गेम्सचा ‘तो’अनुभव
महाराष्ट्रातून एकमेव खेळाडू
या क्षेत्रात आपण काही तरी करू शकतो असं वाटलं होतं. पण नंतर मला दुखापत झाल्यामुळे 2014 आणि 2018 या दोन्ही एशियन गेम माझ्या मिस झाल्या होत्या. पण एकंदरीत सांगायचं झालं तर महाराष्ट्रातून आता मी एकटीच होते. 12 टीम मेंबर मध्ये 5 मुली या हरियाणाच्या होत्या. तर सहा मुली हिमाचलच्या होत्या. मी एकटीच महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करत होते, असं स्नेहलनं सांगितलं.
कशी असते निवड प्रक्रिया?
दरवर्षी सिलेक्शनसाठी नॅशनल स्पर्धा होतात. नॅशनलमधून ज्या बेस्ट स्ट्राईक मुली असतात त्यांची निवड केली जाते. सुरुवात ही क्लब मॅचपासून होते. मग जिल्हा स्तरिय टीम तयार होते. जिल्हा टीम मध्ये आपापसात खेळून एक महाराष्ट्राची टीम तयार होते. सगळे राज्य खेळून 40 मुलींची निवड केली जाते. ही निवड कॅम्पसाठी केली जाते. एक एक महिन्याचे कॅम्प होतात. त्यातून शेवटी 12 मुलीचीं निवड करतात.
क्या बात है! भारतीय संघाने World Cup जिंकला तर हा दुकानदार पाजणार फ्री लस्सी
स्वप्नं बघा आणि कष्ट करा
वडिलांनी जेवढा पाठिंबा दिला तेवढाच नवऱ्याने आणि सासूने देखील मदत करत प्रोत्साहन दिले. वडिलांच मोठं स्वप्न होतं आणि त्यांच्याकडे बघून मोठी ताकद मिळायची. स्वप्न बघा आणि जो पर्यंत ते पूर्ण होत नाही तो पर्यंत त्याचा पाठलाग करा. मेहनतीला पर्याय नाही. मी एवढे वर्ष केलेल्या मेहनतीचे फळ आज मला मिळाले, अशी माहिती भारतीय महिला कबड्डी संघाची स्टार खेळाडू स्नेहल शिंदे यांनी सांगितलं.
शिवछत्रपती पुरस्कारानं सन्मान
स्नेहल शिंदे हिनं आज पर्यंत चार वेळा भारतासाठी कबड्डी संघामध्ये प्रतिनिधित्व केलंय. यामध्ये चार वेळा सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. तसेच 2012-13 साली महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कारही तिला मिळालेला आहे.