दडपणाचा 'तो' क्षण, मात्र त्यावरही मात; नागपूरच्या ओजसनं सांगितला एशियन गेम्सचा ‘तो’अनुभव
- Published by:News18 Marathi
Last Updated:
ओजसच्या या घवघवीत यश आणि ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपुरात परतल्यानंतर त्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतांना दिसतो आहे. यावेळी त्याने एशियन गेम्समधील त्याचा अनुभव शेअर केला.
नागपूर, 13 ऑक्टोबर : भारताच्या क्रीडा विश्वात आपल्या नावे नवा इतिहास रचत एशियन गेम्समध्ये भारतासाठी सलग तीन सुवर्ण पदक मिळवून मायदेशी परतलेल्या विक्रमवीर ओजस देवतळेचे नागपूरात जंगी स्वागत करण्यात आले. चीन येथे संपन्न झालेल्या 19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत ओजसने तिरंदाजी कम्पाऊण्डमध्ये सुवर्ण पदकांची हॅट्रिक करत भारतीय क्रीडा विश्वातील 92 वर्षाच्या इतिहास मोडीत काढला आहे. विशेष म्हणजे अशी कामगिरी करणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. ओजसच्या या घवघवीत यश आणि ऐतिहासिक कामगिरीनंतर नागपुरात परतल्यानंतर त्यावर शुभेच्छाचा वर्षाव होतांना दिसतो आहे. यावेळी त्याने एशियन गेम्समधील त्याचा अनुभव शेअर केला.
नागपुरात एकच उत्साह
ऑरेंज सिटी नागपूरसह तमाम भारतीयांची शान असलेला 21 वर्षीय युवा विश्वविक्रमी तिरंदाज ओजस देवतळे यांच्या नागपूरात परतल्यानंतर त्याच्या राहत्या घरी क्रीडा प्रेमी, चहात्यांची रिघ लागल्याचे चित्र बघायला मिळत आहे. ओजसच्या या कामगिरीबद्दल त्याला शुभेच्छा देत त्याचे तोंड भरून कौतुक केले जात आहे.
advertisement
स्वप्न सत्यात अवतरले
भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देशाचे नाव अधिक उंचावावे असे फार पूर्वीपासून स्वप्न होते. माझे स्वप्न सत्यात अवतरल्यानंतर फार आनंद होतो आहे. अभिषेक वर्मा हे माझे सीनियर आहे. त्यांची फार मोठी साथ मला या प्रवासात लाभली. त्याच्या विरोधात एक प्रतिस्पर्धी म्हणून मला खेळण्याची संधी मिळाली हा माझ्यासाठी हा अनुभव फार महत्त्वाचा होता. त्यांनी मला खूप सहकार्य आणि मार्गदर्शन केले, दोन पदके जिंकल्यानंतर माझ्यावर एक दडपण देखील होतं मात्र त्यावर मात करण्यास मला मदत केली. हा संपूर्ण विजय मी देशाच्या नागरिकांना, माझ्या आई वडील,गुरुवर्य, मित्रपरिवार या साऱ्यांना समर्पित करतो, अशी भावना ओजस देवतळेने बोलताना व्यक्त केली.
advertisement
दडपणाचा 'तो' क्षण, मात्र त्यावरही मात
दोन सुवर्णपदके मिळवल्यानंतर नक्कीच माझ्यासह तमाम भारतीयांच्या अपेक्षा उंचावल्या होत्या, भारतीय क्रीडा विश्वात एक नवा माईल स्टोन या विजयामुळे रचला जाणार होता याची मला कल्पना होती. मला माझ्या कामगिरीवर विश्वास जरी असला तरी एक दडपणाची भावना माझ्या मनात सतत घर करत होती. दक्षिण कोरिया विरुद्ध मिश्र फायनल दरम्यान थोडे दडपण मला जाणवत होते, मात्र कोच प्रवीण सावंत आणि भारतीय संघाचे विदेशी कोचने मला आणि ज्योती सुरेखाला प्रोत्साहन देऊन धीर. त्यामुळेच एका गुराने आम्हीही बाजू मारू शकलो. असे मत ओजसने बोलताना व्यक्त केले.
advertisement
ही मजल गाठू शकला
या यशाचे सर्वस्वी श्रेय हे ओजसच्या मेहनत,जिद्द आणि परिश्रमाचे आहे. त्यांचे क्रीडा प्रशिक्षक, मित्रपरिवार कुटुंबीय यांच्या प्रेम आशीर्वाद आणि सहकार्य यांच्या मुळे ओजस ही मजल गाठू शकला असे माझे प्रांजळ मत आहे, अशी भावना ओजसच्या आई अर्चना देवतळे यांनी बोलताना व्यक्त केली.
advertisement
आई-वडिलांचं खरे योगदान
ओजसला लहानपणापासूनच खेळाची आवड होती. त्यामुळे आई-वडिलांनी त्याला वेळोवेळी प्रोत्साहन दिले. ओजसचे वडील प्रवीण देवतळे व्यावसायिक असून आई अर्चना देवतळे या स्वतःची खासगी शाळा चालवतात. तिरंदाजी हा महागडा खेळ असून सुद्धा त्याच्या घरच्यांनी त्याला आवश्यकता असताना प्रत्येक वेळी क्रीडा साहित्य घेऊन दिले, त्यामुळे मुलाने तिरंदाजी खेळात जे काही कमावले त्यात त्याच्या आई-वडिलांचं सुद्धा तितकंच योगदान आहे.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 13, 2023 3:19 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
दडपणाचा 'तो' क्षण, मात्र त्यावरही मात; नागपूरच्या ओजसनं सांगितला एशियन गेम्सचा ‘तो’अनुभव