advertisement

IND vs USA : 'सूर्या आम्ही येतोय...', युएसएच्या कॅप्टनने मराठीत दिली सुर्यकुमार यादवला वॉर्निंग!

Last Updated:

Harmeet Singh To Suryakumar Yadav : सूर्या मॅजिक करायला आम्ही येतोय... असं म्हणत युएसएचा कॅप्टन हरमीत सिंग याने सूर्यकुमार यादवला वॉर्निंग दिली आहे.

IND vs USA Harmeet Singh Warn to Suryakumar Yadav
IND vs USA Harmeet Singh Warn to Suryakumar Yadav
IND vs USA, T20 World Cup 2026 : क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमधील महाकुंभाला आजपासून सुरूवात होत आहे. आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप आजपासून खेळवला जात आहे. अशातच आज तीन सामने खेळवले जाणार असून भारताचा सामना देखील आज युएसए संघाविरुद्ध होईल. संध्याकाळी सात वाजता हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू होणार असून टीम इंडियाची तयारी देखील पूर्ण झाली आहे. अशातच आता युएसएच्या कॅप्टनने सूर्यकुमार यादवला वॉर्निंग दिली आहे. आयसीसीने याचा व्हिडीओ शेअर केलाय.

सूर्या आम्ही येतोय... - युएसए कॅप्टन

सूर्या मॅजिक करायला आम्ही येतोय... असं म्हणत युएसएचा कॅप्टन हरमीत सिंग याने सूर्यकुमार यादवला वॉर्निंग (Harmeet Singh To Suryakumar Yadav) दिली आहे. मी काय बोललो ते सूर्याला समजेल. आम्ही दोघांनी रणजी ट्रॉफीचा डेब्यू एकत्र केला होता. एका सिझनचा घालमेल असेल. पण डेब्यू करणारे आम्ही पहिले होते. त्यानंतर तो आमचा अंडर 19 मध्ये कॅप्टन होता, असं हरमीत सिंगने म्हटलं आहे.
advertisement
advertisement

माझ्या आयुष्यातील पहिली 27 वर्षे मुंबईतच...

वानखेडेवर खेळणं नेहमीच खास राहिले आहे. मुंबईत लहानाचा मोठा झाल्यामुळे आणि माझ्या आयुष्यातील पहिली 27 वर्षे मुंबईतच क्रिकेट खेळल्यामुळे, मुंबईत परत येऊन वानखेडेवर सामना खेळणे, त्यातही विश्वचषकाचा सामना खेळणं, माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, असंही हरमीत सिंग म्हणाला. त्यावेळी त्याने युएसए संघाच्या रणनितीवर विचार देखील मांडले.
advertisement
advertisement

टीम इंडिया एक बलाढ्य संघ - हरमीत सिंग

दरम्यान, टीम इंडिया एक बलाढ्य संघ आहे. गेल्या वर्षी (स्पर्धेत) आम्ही ज्या प्रकारचा क्रिकेट खेळलो होतो, तोच खेळ पुन्हा एकदा सादर करण्याची आमची योजना आहे. आम्हाला कोणत्याही संघाला श्रेष्ठ मानायचं नाही, असं युएसएच्या कॅप्टनने म्हटलं होतं. गेल्या स्पर्धेत अमेरिका संघाने माजी विजेत्या पाकिस्तानला धक्का दिला होता आणि भारतासमोरही प्रभावी खेळ करत सुपर एटमध्ये स्थान मिळवलं होतं.
advertisement

कोण आहे हरमीत सिंग?

हरमीत सिंग हा स्लो लेफ्ट-आर्म ऑर्थोडॉक्स स्पिनर आणि मिडल ऑर्डर बॅटर म्हणून ओळखला जातो. त्याने आपल्या क्रिकेट करिअरची सुरुवात भारतात केली होती आणि तो 2012 चा अंडर-19 विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय टीमचा भाग होता. भारतातील घरगुती क्रिकेटमध्ये हरमीतने मुंबई आणि त्रिपुरा या टीम्सचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र, अधिक चांगल्या संधींच्या शोधात त्याने 2020 मध्ये अमेरिकेत स्थलांतर केलं. तिथं त्याने मायनर लीग क्रिकेट आणि मेजर लीग क्रिकेटमध्ये (MLC) आपली छाप पाडली. तो सिएटल थंडरबोल्ट्स टीमचा कॅप्टन होता आणि सिएटल ऑर्कस या टीमसाठीही त्याने चांगली कामगिरी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IND vs USA : 'सूर्या आम्ही येतोय...', युएसएच्या कॅप्टनने मराठीत दिली सुर्यकुमार यादवला वॉर्निंग!
Next Article
advertisement
पाकिस्तानचा कोपरा न् कोपरा 'डेथ रेंज'मध्ये, शांघाय टार्गेटवर; भारताकडून घरात घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी; आशियातील लष्करी समीकरणं बदलले
संपूर्ण पाकिस्तान डेथ रेंजमध्ये;भारताकडून घुसून मारणाऱ्या Missileची चाचणी
  • भारताच्या किनाऱ्यावरून Missileचा धमाका

  • बीजिंग ते रावळपिंडीपर्यंतचे बंकर हादरले

  • शांघाय टार्गेटवर, तर पाकमध्ये हाहाकार

View All
advertisement