मुंबई - दहीहंडी हा खेळ आता फक्त महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नसून महाराष्ट्र शासनाने दिलेल्या साहसी खेळाच्या दर्जामुळे आणि प्रो गोविंदासारख्या स्पर्धांमुळे सातासमुद्रापार जाऊन पोहोचला आहे. यातच आता महाराष्ट्रातील गोविंदांचा संघ स्पेनमधील ‘डेल पेनडेस विला फ्रांका’ येथे झालेल्या ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024’ या स्पर्धेत सहभागी झाला होता. जगभरातील 12 देशांमधील स्पर्धकांशी सामना करत भारतीय संघाने या स्पर्धेत जागतिक पाळतीवर आपले नाव कोरले आहे. त्यांच्या विजयाचा हा प्रवास नेमका कसा झाला, ते जाणून घेऊयात.
advertisement
महाराष्ट्रातील गोविंदांचा संघ स्पेनमध्ये ‘कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024’ स्पर्धेत सहभागी झाला होता. या स्पर्धेत महाराष्ट्राच्या गोविंदांनी बाजी मारत ही स्पर्धा जिंकली आहे. ही स्पर्धा मानवी मनोरे बांधण्याच्या कलेतील प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय स्पर्धांपैकी एक मानली जाते. यामध्ये महाराष्ट्राच्या शिलेदारांनी महाराष्ट्राचे नाव उंचावत ही स्पर्धा आपल्या नावावर केली.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पुर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्त्वाखाली हा संघ याठिकाणी सहभागी झाला. या स्पर्धेत जिंकून महाराष्ट्राच्या गोविंदांनी जागतिक स्तरावर एकता, सामर्थ्य आणि जिद्दीचे प्रदर्शन केले.
आधी न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी अन् हातात तलवार का होती?, जाणून घ्या, यामागचं कारण..
आतापर्यंत आपण महिलांची आणि पुरूषांची वेगवेगळी दहीहंडी थर रचताना पाहत आलो आहे. पण, मुख्य म्हणजे पहिल्यांदाच महिला आणि पुरुष यांनी एकत्र येवून स्पेनमधील ‘डेल पेनडेस विला फ्रांका’ येथे 7 थर रचून ही कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024 ची स्पर्धा जिंकली.
‘कॉनकुर इंटरनॅशनल्स 2024’ स्पर्धेत स्वित्झर्लंड, डेन्मार्क, फ्रान्स, नॉर्वे आणि अँडोरा यांसारख्या विविध देशांतील 12 संघांचा समावेश होता आणि या स्पर्धेत महाराष्ट्राच्या गोविंदांनी विजय मिळवला. या विजयामुळे महाराष्ट्र आणि भारताचे नाव जागतिक पातळीवर गाजले आहे.