TRENDING:

AUS vs ENG : अ‍ॅशेसमध्ये मोठा राडा! लाबुशेनने मुद्दामहून खोड काढली, पुढच्याच ओव्हरमध्ये स्टोक्सचं चोथ प्रत्युत्तर, 29 व्या ओव्हरनंतर काय घडलं?

Last Updated:

Marnus Labuschagne ben Stokes Fight : ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन आणि इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यांच्यात भर मैदानात शाब्दिक चकमक झाली. लाबुशेन हा विरोधी टीमच्या खेळाडूंना डिवचण्यासाठी प्रसिद्ध आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Marnus Labuschagne ben Stokes Fight : सिडनी क्रिकेट ग्राउंडवर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस सिरीजच्या 5 व्या टेस्टमध्ये दुसऱ्या दिवशी क्रिकेटच्या थरारासोबतच खेळाडूंचा आक्रमक अवतारही पाहायला मिळाला. ही सिरीज सध्या अत्यंत चुरशीच्या वळणावर असून, ऑस्ट्रेलियाने यापूर्वीच 3-1 अशी आघाडी घेतली आहे. अशातच सिडनी टेस्टच्या दुसऱ्या दिवशी मैदानात दोन दिग्गज खेळाडूंमध्ये जुंपल्याने प्रेक्षकांचे चांगलेच मनोरंजन झालं. नेमकं काय घडलं होतं? पाहा
Marnus Labuschagne ben Stokes Fight
Marnus Labuschagne ben Stokes Fight
advertisement

भर मैदानात शाब्दिक चकमक

ऑस्ट्रेलियाचा फलंदाज मार्नस लाबुशेन आणि इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स यांच्यात भर मैदानात शाब्दिक चकमक झाली. लाबुशेन हा विरोधी टीमच्या खेळाडूंना डिवचण्यासाठी प्रसिद्ध आहे आणि त्याने स्टोक्ससोबतही तसेच काहीसे करण्याचा प्रयत्न केला. इंग्लंडने टॉस जिंकून पहिल्या इनिंगमध्ये जो रूटच्या शतकाच्या जोरावर 384 रन्सचा डोंगर उभा केला होता. याला प्रत्युत्तर देताना ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली असली तरी, ट्रेविस हेड आणि लाबुशेन यांनी दुसऱ्या विकेटसाठी शतकीय पार्टनरशिप करून इंग्लंडची डोकेदुखी वाढवली होती.

advertisement

स्टोक्सचं लाबुशेनला चोख प्रत्युत्तर

मैदानावर ही पार्टनरशिप फोडण्यासाठी इंग्लंडचा कॅप्टन बेन स्टोक्स धडपडत असताना लाबुशेनने त्याला काहीतरी बोलून उकसवले. यानंतर स्टोक्सने संतापून लाबुशेनच्या जवळ जात थेट त्याची मान पकडली आणि त्याला वॉर्निंग दिली. दोघांमध्ये बराच वेळ वाद सुरू असताना अंपायरने मध्यस्थी करत दोघांना शांत केलं. मात्र, स्टोक्सने केवळ बोलून नाही तर आपल्या खेळाने लाबुशेनला चोख प्रत्युत्तर दिलं. या वादानंतरच्या पुढच्याच ओव्हरमध्ये स्टोक्सने लाबुशेनला 48 रन्सवर आऊट करत पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

advertisement

ट्रेव्हिस हेडने डोकेदुखी वाढवली

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पुण्यातील असंही हॉस्पिटल, मुलीचा जन्म झाल्यास घेतला जात नाही एकही रुपया
सर्व पहा

दरम्यान, दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियाने 2 बाद 166 रन्स केले आहेत. ट्रेविस हेड सध्या 91 रन्सवर नाबाद खेळत असून तो आपल्या शतकाच्या जवळ आहे. स्टोक्सने लाबुशेनला बाद करून इंग्लंडला महत्त्वाचे यश मिळवून दिले असले तरी, हेडची बॅटिंग पाहता ऑस्ट्रेलिया मजबूत स्थितीत दिसत आहे. ॲशेसच्या या शेवटच्या मॅचमध्ये आता पुढच्या दिवसांत कोणता संघ बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
AUS vs ENG : अ‍ॅशेसमध्ये मोठा राडा! लाबुशेनने मुद्दामहून खोड काढली, पुढच्याच ओव्हरमध्ये स्टोक्सचं चोथ प्रत्युत्तर, 29 व्या ओव्हरनंतर काय घडलं?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल