हा खेळाडू दुसरा तिसरा कुणी नसून के एल राहुल आहे. के एल राहुल यंदाच्या हंगामात चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्याने यंदाच्या हंगामात 11 सामन्यात 493 धावा केल्या आहेत. त्याची सरासरी 61.62 आहे. ही झाली या आयपीएलची आकडेवारी आहे. आता वानखेडेच्या मैदानावर राहुलची बॅटीने काय कमाल केली आहे, ती पाहूयात.
के एल राहुलने मुंबई इंडियन्स विरूद्ध 965 धावा ठोकल्या आहेत. यावेळी त्याची सरासरी 74.35 होती.याचाच अर्थ प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध या सर्वाधिक धावा आणि सरासरी आहे. विशेष म्हणजे वानखेडेच्या मैदानावर त्याने 400 धावा केल्या आहेत. त्यामुळे या मैदानावर त्याचा सरासरी 100 आहे. राहुलची हीच आकडेवारी मुंबई इंडियन्सला घाम फोडू शकते.त्यामुळे मुंबईचं टेन्शन वाढलं आहे.
हवामानाचा अंदाज काय?
Weather.com च्या अंदाजानुसार, आज मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची (Mumbai Rain) दाट शक्यता आहे. यामुळे टॉस आणि सामन्याची सुरुवात देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज इतका खराब आहे की, आयपीएल सामन्यांसाठी वाढवण्यात आलेला अतिरिक्त वेळही निरुपयोगी ठरू शकतो.