दिल्लीचा मेंटॉर आणि इग्लिश क्रिकेटपटून केविन पिटरसनने आजच्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यावर प्रतिक्रिया दिली आहे.खरं तर आजच्या सामन्यावर पावसाचे संकट आहे. त्यामुळे हा सामना पुर्ण होईल की नाही याच्या शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे हा सामना पावसामुळे रद्द होईल अशी भिती आहे. या भितीपोटीच आता इंग्लिश क्रिकेटपटूने हिंदीतून ट्विट केलं आहे. पावसा पावसा जा, दुसऱ्या दिवशी पुन्हा ये, अशी केविट पिटरसन वरूण राजाकडे मागणी करताना दिसला आहे.
advertisement
हवामानाचा अंदाज काय?
Weather.com च्या अंदाजानुसार, आज मुंबईत वादळी वाऱ्यांसह पावसाची (Mumbai Rain) दाट शक्यता आहे. यामुळे टॉस आणि सामन्याची सुरुवात देखील लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. हवामानाचा अंदाज इतका खराब आहे की, आयपीएल सामन्यांसाठी वाढवण्यात आलेला अतिरिक्त वेळही निरुपयोगी ठरू शकतो.
मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर?
मुंबई इंडियन्सचे आत्तापर्यंत 12 सामने खेळले असून पटलणकडे अजून दोन सामने शिल्लक आहेत. त्यातील एक सामना आज खेळवला जाईल. या सामन्यात जर पावसाने खोडा घातला तर मुंबईसमोरचं गणित अधिकच बिकट होईल. दोन्ही संघांना एक एक गुण वाटून देण्यात आले तर मुंबई इंडियन्सला काहीही करून आगामी सामना पंजाब किंग्जविरुद्ध जिंकावा लागेल. पलटण असं करू शकली नाही तर मुंबई इंडियन्स प्लेऑफमधून बाहेर जाईल.
दिल्ली जर आमचा सामना जिंकला आणि त्यानंतर त्यांनी पंजाबचा पराभव केला तर ते प्लेऑफमध्ये पोहोचू शकणार आहे. आणि जरी आज मुंबईला हरवले त्यानंतर पंजाब विरूद्ध दिल्लीचा पराभव जरी झाला आणि मुंबईने पंजाबला हरवले तर दिल्ली प्लेऑफमध्ये पोहोचू शकते.