TRENDING:

MI VS SRH : मुंबई इंडियन्सची झुंज अपयशी, सनरायजर्स हैदराबादचा दणदणीत विजय

Last Updated:

विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करण्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यामुळे हैदराबादचा 31 धावांनी विजय झाला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : जगप्रसिद्ध टी 20 लीग पैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या सीझनला सुरुवात झाली आहे. या सीझनचा आठवा सामना हा मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात खेळवण्यात आला . या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठा स्कोअर करून मुंबई इंडियन्सला विजयासाठी 278 धावांचे आव्हान दिले होते. मात्र विजयासाठी दिलेले आव्हान पूर्ण करण्यात मुंबई इंडियन्सचे फलंदाज अपयशी ठरले आणि त्यामुळे हैदराबादचा 31 धावांनी विजय झाला.
सनरायजर्स हैदराबादचा दणदणीत विजय
सनरायजर्स हैदराबादचा दणदणीत विजय
advertisement

हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात आयपीएल 2024 चा आठवा सामना खेळवला गेला. या सामन्यापूर्वी झालेला टॉस मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सनरायजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना 20 ओव्हरमध्ये तब्बल 277 धावा केल्या. यादरम्यान हैदराबादच्या फलंदाजांपैकी ट्रेव्हिस हेडने 62, मयांक अग्रवालने 11, अभिषेक शर्माने 63, हेन्रिच क्लासेनने 80 तर एडन मार्करमने 42 धावांची खेळी केली.

advertisement

सनरायजर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सला विजयासाठी 20 ओव्हरमध्ये 278 धावा करण्याचे आव्हान दिले होते. मुंबई इंडियन्सचे फलंदाज हे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरले. सुरुवातीला रोहित शर्मा आणि ईशान किशनने चांगली पार्टनरशिप केली आणि 3.2 ओव्हरमध्ये 56 धावा केल्या. परंतु त्यानंतर ईशान आणि रोहित या दोघांची विकेट घेण्यात हैदराबादच्या गोलंदाजांना यश आले.

advertisement

मुंबईच्या दोन विकेट्स गेल्यावर तिलक वर्माने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. तिलकने 34 बॉलमध्ये ६४ धावांची खेळी केली, परंतु पॅट कमिन्सने त्याची विकेट घेतली. मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माने 26 , ईशान किशनने 34 , हार्दिक पंड्याने 24 , टीम डेव्हिडने 42 , नमन धीरने 30, रोमारिओने 15 धावांची खेळी केली. अखेर विजयाचे आव्हानपूर्ण करता न आल्याने मुंबई इंडियन्सचा 31 धावांनी पराभव झाला आणि सनरायजर्स हैदराबादने होम ग्राउंडवर आयपीएल 2024 चा पहिला सामना जिंकला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
MI VS SRH : मुंबई इंडियन्सची झुंज अपयशी, सनरायजर्स हैदराबादचा दणदणीत विजय
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल