'रिटर्न-टू-प्ले' प्रोटोकॉल
'क्रिकेट डॉट कॉम एयू'च्या रिपोर्टनुसार, ऑस्ट्रेलियाच्या 36 वर्षीय दिग्गज बॉलर मिचेल स्टार्कला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे विश्रांती देण्यात आली आहे. स्टार्कने नुकतीच ॲशेस सिरीजमधील पाचही टेस्ट मॅच खेळल्या होत्या आणि त्यानंतर तो बिग बॅश लीगमध्येही व्यस्त होता. सततच्या क्रिकेटमुळे त्याच्या फिटनेसवर परिणाम होऊ नये, यासाठी ऑस्ट्रेलियन बोर्डाने त्याला आयपीएल 2026 सुरुवातीच्या टप्प्यात विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. त्याची टीममधील वापसी आता 'रिटर्न-टू-प्ले' प्रोटोकॉल आणि फिटनेस टेस्टवर अवलंबून असेल.
advertisement
सर्वाधिक बोली लावलेला बॉलर
आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली लावलेला बॉलर म्हणून त्याची ओळख आहे. केकेआरने त्याला रिलीज केल्यानंतर आता तो दिल्लीसाठी खेळतो. अशातच मिचेल स्टार्क हा नवीन बॉलने स्विंग करण्यासोबतच डेथ ओव्हर्समध्ये भेदक यॉर्कर टाकण्यासाठी ओळखला जातो. गेल्या सीजनमध्ये त्याने 11 मॅच खेळताना 14 विकेट्स घेतल्या होत्या. जरी त्याचा इकॉनॉमी रेट 10 च्या वर होता, तरीही मोठ्या मॅचेसमध्ये गेम फिरवण्याची क्षमता त्याच्याकडे असल्याने दिल्लीसाठी तो एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्यामुळे आता तो कमबॅक कधी करणार? असा सवाल विचारला जातोय.
IPL 2026 : संजू सॅमसन आला पण CSK ला 440 वोल्टचा झटका! 31 वर्षांचा स्टार खेळाडू आयपीएलमधून बाहेर
दिल्ली कॅपिटल्सचा संपूर्ण संघ -
केएल राहुल, डेव्हिड मिलर, पृथ्वी शॉ, पथुम निसांका, करुण नायर, साहिल पारख, समीर रिझवी, बेन डकेट, अभिषेक पोरेल, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कॅप्टन), नितीश राणा, आशुतोष शर्मा, अजय मंडल, मिशेल स्टार्क, कुलदीप यादव, एन कुमारी, लूके, कुमारी, टी. जेमिसन, दुष्मंथा चमीरा, विपराज निगम, औकीब नबी दार, माधव तिवारी आणि त्रिपुराण विजय.
