TRENDING:

मिताली राजने सांगितला यशाचा मंत्र; जिंकणं-हरणं येत-जातं, फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा

Last Updated:

News18 Rising Bharat Summit: मिताली राजने न्यूज18 रायझिंग भारतमध्ये क्रीडा क्षेत्रातील अनिश्चिततेवर प्रकाश टाकला. संयम आणि संघावर विश्वास ठेवण्याचे महत्त्व सांगितले.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाच्या माजी कर्णधार मिताली राजने ‘न्यूज18 रायझिंग भारत’ कार्यक्रमात सांगितले की, क्रीडा क्षेत्र पूर्णपणे धोका आणि अनिश्चिततेने भरलेले असते. मितालीच्या मते मैदान असो किंवा आयुष्य दोन्हीकडे चढ-उतार ही सामान्य बाब आहे. अशा परिस्थितीत नेहमी संयम आणि धैर्याने काम करणे आवश्यक असते.
News18
News18
advertisement

मिताली राजने सांगितले एखादा खेळाडू एका सामन्यात शतक झळकावतो, तर पुढच्याच सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद होऊ शकतो. खेळ आणि आयुष्य दोन्हीत यश आणि अडचणी येत-जात राहतात. त्यामुळे सर्वात महत्त्वाचे म्हणजे संयम राखणे आणि संघावर विश्वास ठेवणे गरजेचे आहे.

संघावर विश्वास ठेवणे आवश्यक

संघभावनेवर भर देताना मिताली राज म्हटले की एखाद्या खेळाडूसाठी आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खेळाडूची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा तो चांगल्या आणि वाईट दोन्ही काळात आपल्या संघाची साथ सोडत नाही. अशा वेळी संघावर विश्वास ठेवणे हीच सर्वात मोठी गोष्ट असते.

advertisement

मिताली राजची कारकीर्द

मिताली राजचा समावेश भारतातील दिग्गज महिला क्रिकेटपटूंमध्ये केला जातो. मितालीने भारतीय संघासाठी 12 कसोटी, 232 वनडे आणि 89 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये मितालीच्या नावावर 1 शतक आणि 4 अर्धशतकांसह 699 धावा आहेत.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
होळीला बाहेरचे रंग कशाला, घरीच बनवा केमिकल मुक्त कलर, making चा संपूर्ण Video
सर्व पहा

वनडे क्रिकेटमध्ये मितालीची कामगिरी विशेष उल्लेखनीय राहिली आहे. वनडेमध्ये भारतासाठी 7805 धावा केल्या असून 7 शतके आणि 64 अर्धशतके झळकावली आहेत. टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मितालीने दमदार प्रदर्शन करत 2364 धावा केल्या आहेत. या प्रकारात तिच्या नावावर 17 अर्धशतके आहेत.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
मिताली राजने सांगितला यशाचा मंत्र; जिंकणं-हरणं येत-जातं, फक्त एका गोष्टीवर विश्वास ठेवा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल