कैफने दिलं स्पष्टीकरण
'कृपया ही एका हितचिंतक आणि चाहत्याची क्रिकेटबद्दलची टिप्पणी समज. तू भारतीय क्रिकेटमधला सगळ्यात मोठा मॅच विनर आहेस. टीम इंडियाची जर्सी घालून तू मैदानावर सर्वस्व देण्यासाठी काय करावं लागतं, हे मला माहिती आहे', असं कैफ म्हणाला आहे. कैफ याच्या या वक्तव्यामुळे त्याच्यातला आणि बुमराहमधला तणाव कमी व्हायची शक्यता आहे.
advertisement
काय म्हणाला होता मोहम्मद कैफ?
यापूर्वी, मोहम्मद कैफने सोशल मीडिया पोस्टमध्ये जसप्रीत बुमराहच्या वर्कलोड आणि बॉलिंग स्ट्रॅटेजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. कैफने म्हटले होते की बुमराह आता सामान्यतः डेथ ओव्हर्स टाळत आहे आणि दुखापती टाळण्यासाठी सुरुवातीच्या ओव्हरमध्ये बॉलिंग करत आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली बुमराह सामान्यतः 1, 13, 17 आणि 19वी ओव्हर टाकायचा, तर सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली त्याने आशिया कपमध्ये पॉवर प्लेमध्येच तीन ओव्हर टाकल्या. बुमराहची ही रणनीती विरोधी टीमच्या बॅटरना दिलासादायक ठरेल. वर्ल्ड कपसारख्या मोठ्या स्पर्धेत भारतासाठी यामुळे धोका निर्माण होऊ शकतो'.
बुमराहने दिलं कैफला प्रत्युत्तर
मोहम्मद कैफच्या या पोस्टनंतर स्वत: जसप्रीत बुमराहने त्यावर रिप्लाय दिला. आधीचंही चुकीचं आणि आताचंही, असं म्हणत बुमराहने कैफचं वक्तव्य चुकीचं असल्याचं म्हणलं. या उत्तरामुळे कैफ आणि बुमराह यांच्यातला वाद वाढतो का काय? अशी शक्यता निर्माण झाली होती, पण कैफने यावर सौम्य प्रतिक्रिया दिल्यामुळे हा वाद निवळल्याचं म्हणावं लागेल.