TRENDING:

बॉल नाही आगीचा गोळा टाकतोय शमी! लागोपाठ तिसऱ्या सामन्यात खतरनाक स्पेल, आगरकरचे डोळे कधी उघडणार?

Last Updated:

मागच्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका केला आहे. मागच्या 3 सामन्यांमध्ये शमीने तब्बल 11 विकेट घेतल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
हैदराबाद : मागच्या काही काळापासून टीम इंडियाबाहेर असलेल्या मोहम्मद शमीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये धमाका केला आहे. मागच्या 3 सामन्यांमध्ये शमीने तब्बल 11 विकेट घेतल्या आहेत. हरियाणाविरुद्ध सोमवारी झालेल्या सामन्यात शमीने भेदक स्पेल टाकला, त्याने 4 ओव्हरमध्ये 30 रन देऊन 4 विकेट मिळवल्या. याआधी त्याने पुदुच्चेरीविरुद्ध 4 ओव्हरमध्ये 34 रन देऊन 3 विकेट घेतल्या होत्या, तर सर्व्हिसेसविरुद्ध त्याने 3.2 ओव्हर टाकून 13 रन देत 4 विकेट घेण्यात यश मिळवलं.
बॉल नाही आगीचा गोळा टाकतोय शमी! लागोपाठ तिसऱ्या सामन्यात खतरनाक स्पेल, आगरकरचे डोळे कधी उघडणार?
बॉल नाही आगीचा गोळा टाकतोय शमी! लागोपाठ तिसऱ्या सामन्यात खतरनाक स्पेल, आगरकरचे डोळे कधी उघडणार?
advertisement

हरियाणाविरुद्धच्या सामन्यात शमीने 4 विकेट घेतल्या असल्या तरी या सामन्यात बंगालचा 24 रननी पराभव झाला आहे. मोहम्मद शमी भारताकडून शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना मार्च महिन्यात चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला, पण त्यानंतर शमीची टीम इंडियात निवड झाली नाही. निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी शमीच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले, यानंतर शमीने अजित आगरकरवर थेट निशाणा साधला. आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये भेदक बॉलिंग करून दाखवल्यानंतर तरी आगरकरचे डोळे उघडणार का? असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

advertisement

चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर आयपीएल 2025 मध्ये मोहम्मद शमीची कामगिरी निराशाजनक झाली. आयपीएल 2026 च्या मोसमाआधी सनरायजर्स हैदराबादने शमीला लखनऊ सुपर जाएंट्सकडे ट्रेड केलं आहे. आधी रणजी ट्रॉफी आणि आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमीने त्याच्या भेदक बॉलिंगने निवड समितीला त्याचा विचार करायला भाग पाडलं आहे.

आगरकर-शमी वाद

शमी निवडीसाठी फिट नसल्यामुळे तो चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 नंतर टीम इंडियाकडून खेळला नसल्याचं अजित आगरकर म्हणाले होते. अजित आगरकर यांच्या या दाव्यावर मोहम्मद शमीने पलटवार केला. 'निवड समितीने मला कोणतीही अपडेट दिली नाही. मी फिट नसतो तर दुलीप ट्रॉफी आणि बंगालकडून रणजी ट्रॉफी कशी खेळले असतो?' असं शमी म्हणाला. यावर मी खेळाडूंसोबत संपर्कात असतो आणि माझा मोबाईलही नेहमी सुरू असतो, असं प्रत्युत्तर अजित आगरकरने दिलं होतं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळीच्या दरात वाढ, गुळ आणि आल्याला आज काय मिळाला भाव? एका क्लिकवर चेक करा अपडेट
सर्व पहा

अपडेट देणे किंवा मागणे ही माझी जबाबदारी नाही. माझ्या फिटनेसबद्दल अपडेट देणं हे माझं काम नाही. माझं काम एनसीएमध्ये जाणे, तयारी करणे आणि सामने खेळणे आहे, असं मोहम्मद शमी म्हणाला होता, यानंतर अजित आगरकरनेही प्रतिक्रिया दिली. आपलं शमीसोबत मागच्या काही महिन्यात अनेकवेळा बोलणं झालं आहे. मेडिकल टीमला तो अजून आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी फिट नसल्याचं वाटत आहे, असा दावा अजित आगरकरने केला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
बॉल नाही आगीचा गोळा टाकतोय शमी! लागोपाठ तिसऱ्या सामन्यात खतरनाक स्पेल, आगरकरचे डोळे कधी उघडणार?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल