खरं तर वानखेडेच्या मैदानावरील विजयानंतर मुंबईने तुफान जल्लोष केला. कारण मुंबई संघ हा प्लेऑफमध्ये पोहोचला आहे. वानखेडेच्या मैदानावर हा शेवटचा सामना असल्या कारणाने मुंबईच्या संघाने मैदानावर एक फेरी मारुन मुंबईच्या चाहत्यांचे आभार मानले होते.
दरम्यान ज्यावेळेस मुंबईने हा सामना जिंकला त्यानंतर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी एकमेकांना हस्तांदोलन केले.यावेळी आजारी असलेला अक्षर पटेल देखील मैदानात आला होता.यावेळी हार्दिक पंड्याने त्याच्याशी हात मिळवणी करून त्याची गळाभेट घेतली व डोक्याच्या बाजूला चुंबन घेतले. विशेष म्हणजे हार्दिक पंड्याने अशी कृती करून अक्षर पटेल आणि दिल्ली कॅपिटल्सच्या प्रती दु:ख व्यक्त केले होते.
त्यामुळे मैदानावरील हे दृष्य पाहून मुंबई इंडियन्स आणि दिली कॅपिटल्सचे फॅन्स प्रचंड खूश झाली होती. या संदर्भातला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुंबई विरूद्धच्या सामन्यात अक्षर पटेल खेळू शकला नव्हता.कारण अक्षर पटेल आजारी होता अशी माहिती फॅफ ड्युप्लेसीसने दिली होती.त्यामुळे अक्षर पटेलच्या जागी फॅफ ड्युप्लेसीस संघाचे नेतृत्व केले होते. इतक्या महत्वाच्या सामन्यात अक्षर पटेल खेळला नसल्याने दिल्ली कॅपिटल्सला मोठा झटका बसला होता.