सलग दुसरा पराभव
विमेन्स प्रीमियर लीग 2026 च्या रंगतदार टप्प्यात आता मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. आरसीबीसाठी हा निकाल धक्कादायक ठरला कारण सलग 5 विजय मिळवल्यानंतर त्यांना आता सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतरही आरसीबीचे गुणतालिकेतील स्थान सध्या तरी सुरक्षित असल्याचे दिसत आहे. आरसीबी थेट फायनलमध्ये जाऊ शकते. तर मुंबई, दिल्ली आणि गुजरात या तीन संघात एलिमिनेटरसाठी फाईट पहायला मिळेल.
advertisement
टॉप 2 मध्ये झेप
मुंबई इंडियन्सने या मॅचमध्ये मिळवलेला विजय त्यांच्यासाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो. सलग 3 पराभव पत्करल्यानंतर सातव्या मॅचमध्ये मुंबईने आपला तिसरा विजय नोंदवला आहे. या विजयामुळे मुंबईने थेट खालच्या क्रमांकावरून टॉप 2 मध्ये झेप घेतली आहे. मुंबईचा नेट रनरेट आता इतर टीम्सच्या तुलनेत सुधारला असून त्यांनी दिल्ली कॅपिटल्सला तिसऱ्या स्थानावर ढकलले आहे. सध्या मुंबई, दिल्ली आणि गुजरात या तिन्ही टीम्सचे 6-6 पॉइंट्स झाले आहेत.
मुंबईला एलिमिनेटर खेळायची असेल तर...
दरम्यान, आता मुंबई इंडियन्सला जर एलिमिनेटर खेळायंच असेल तर अखेरचा सामना काहीही करून जिंकावा लागणार आहे. जर अखेरच्या सामन्यात मुंबई हरली तर थेट बाहेरचा रस्ता धरावा लागणार आहे. पण मुंबईला एलिमिनेटर खेळायची असेल तर गुजरात आणि दिल्लीला आगामी सामना गमवावा लागणार आहे. त्यामुळे आता मुंबईच समीकरण अधिक रोमांचक झालं आहे.
