ऑस्ट्रेलियातील स्थानिक टी20 स्पर्धेत खेळताना, स्कॉट एडवर्ड्सने फोर आणि सिक्सचा वर्षाव केला, ज्यामुळे बॉलरना घाम फुटला. क्लेन्झो ग्रुप शील्ड स्पर्धेत अल्टोना स्पोर्ट्स टी20 फर्स्ट इलेव्हनकडून खेळताना, स्कॉट एडवर्ड्सने चौथ्या फेरीच्या सामन्यात तुफानी द्विशतक झळकावले. नेदरलँड्ससाठी 82 टी20 सामने खेळलेल्या एडवर्ड्सने स्थानिक बॉलरवर आक्रमण केलं.
81 बॉलमध्ये 37 सिक्स-फोर
विल्यम्स लँडिंग एससी टी20 विरुद्धच्या सामन्यात, एडवर्ड्सच्या संघाने प्रथम बॅटिंग केली आणि त्याने डावाची सुरुवात केली. उजव्या हाताचा बॅटर असलेल्या एडवर्ड्सने विल्यम्सच्या बॉलिंगवर हल्ला चढवला आणि फक्त 81 बॉलमध्ये अविश्वसनीय 229 रन केल्या. पहिल्या बॉलपासून शेवटच्या बॉलपर्यंत तो क्रीजवर राहिला. या वादळी खेळीमध्ये एडवर्ड्सने फोरपेक्षा जास्त सिक्स मारले. त्याने 282 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली आणि 23 सिक्स आणि 14 फोर मारले.
advertisement
स्थानिक स्पर्धा असल्यामुळे एडवर्ड्सने केलेलं हे द्विशतक अधिकृत रेकॉर्डमध्ये गणले जाणार नाही. टी20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या किंवा त्याच्या संघाच्या कामगिरीवर त्याचा कोणताही महत्त्वपूर्ण परिणाम होण्याची शक्यता कमी आहे. तरीही, 20 ओव्हरच्या सामन्यात द्विशतक झळकावून त्याने निश्चितच कौतुकास्पद कामगिरी केली आहे. सामन्याबद्दल सांगायचे झाले तर, त्याच्या संघाने, अल्टोनाने 304 रन केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना विरोधी टीमचा 16.5 ओव्हरमध्ये 110 रनवर ऑलआऊट झाला.
