TRENDING:

New Rule In IPL : आयपीएल 2024मध्ये लागू होणार 'हा' नियम; बॉलर्ससाठी ठरणार 'ब्रह्मास्त्रा'सारखा

Last Updated:

आयपीएल 2024 पासूनच्या टुर्नामेंटमध्ये एक नवीन बदल करण्यात आला आहे. आता बॉल आणि बॅटमध्ये समान स्पर्धा असेल. ही टुर्नामेंट बॉलर्सना सुसह्य राहावी यासाठी त्यांना प्रतिओव्हर दोन बाउन्सर टाकण्याची परवानगी या सीझनपासून मिळणार आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई, 20 डिसेंबर : क्रिकेटच्या आयपीएल स्पर्धेसाठी आता नवीन नियम लागू होणार आहे. एका अर्थाने हा नियम म्हणजे आयपीएल आयोजकांनी क्रिकेटर्सना दिलेली एक खूशखबर म्हणावी लागेल. बॉलर्सच्या सुविधेसाठी आता त्यांना प्रतिओव्हर दोन बाउन्सर टाकण्याची संधी येत्या टुर्नामेंटपासून मिळणार आहे. याबाबतची ट्रायल नुकतीच घेण्यात आली आहे. एका अर्थाने हा नियम बॉलर्ससाठी महत्त्वाचं अस्त्र ठरणार आहे. नवीन नियमाबाबत सविस्तर जाणून घेऊ या. 'लाइव्ह हिंदुस्तान डॉट कॉम'ने याविषयीचं वृत्त दिलं आहे.
News18
News18
advertisement

आयपीएल 2024 पासूनच्या टुर्नामेंटमध्ये एक नवीन बदल करण्यात आला आहे. आता बॉल आणि बॅटमध्ये समान स्पर्धा असेल. ही टुर्नामेंट बॉलर्सना सुसह्य राहावी यासाठी त्यांना प्रतिओव्हर दोन बाउन्सर टाकण्याची परवानगी या सीझनपासून मिळणार आहे. आयपीएलच्या आयोजकांनी या संदर्भात निर्णय घेतला आहे. क्रिकेटमधल्या या बदलाची ट्रायल भारतातल्या डोमेस्टिक टी-20 टुर्नामेंट सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या नुकत्याच झालेल्या मॅचेसमध्ये घेण्यात आली आहे. हा नियम बॉलर्ससाठी महत्त्वाचं अस्त्र ठरणार आहे. कारण डेथ ओव्हर्समध्ये त्यांच्याकडे आणखी पर्याय उपलब्ध होईल.

advertisement

सौराष्ट्रचे अनुभवी बॉलर आणि वेगवेगळ्या टीममधून आयपीएल खेळलेले जयदेव उनाडकट यांनी दोन बाउन्सरच्या नियमाचं स्वागत केलं आहे. ईएसपीएन क्रिक इन्फोशी बोलताना ते म्हणाले, की 'मला वाटतं की एका ओव्हरमध्ये दोन बाउन्सर्सचा चांगला उपयोग होऊ शकतो. हा नियम अन्य नियमांप्रमाणे बॉलर्सना बॅट्समनप्रमाणेच अतिरिक्त लाभदायक ठरतो. उदाहरणार्थ, जर मी स्लो बाउन्सर टाकला तर आता यानंतर बाउन्सर टाकला जाणार नाही असा आत्मविश्वास यापूर्वी बॅट्समनला वाटायचा; पण आता भलेही तुम्ही ओव्हरच्या सुरुवातीला एक स्लो बाउन्सर टाकला तरी पुन्हा एकदा बाउन्सर टाकू शकाल.'

advertisement

'जे बॅट्समन बाउन्सरचा सामना करायला सक्षम नाहीत, त्यांना आता सक्षम व्हावं लागेल आणि यामुळे बॉलर्सकडे आणखी एक नवीन शस्त्र असेल. त्यामुळे मला वाटतं की हा लहान बदल मोठा परिणामकारक आहे. एक बॉलर म्हणून मला वाटतं, की या नियमाचं पालन अत्यंत महत्त्वाचं आहे. फास्ट बॉलर्सकडे आता डेथ ओव्हर्समध्ये बॅट्समनला लगाम घालण्यासाठी एकापेक्षा जास्त पर्याय उपलब्ध असतील,' असं उनाडकट म्हणाले.

advertisement

दरम्यान, इम्पॉक्ट प्लेयरचा नियम पहिल्यांदा आयपीएल 2023 मध्ये लागू केला गेला. हा नियम कायम राहणार आहे. या नियमानुसार, टॉसच्या वेळी एका टीमला प्लेइंग इलेव्हनशिवाय चार पर्यायांची यादी सादर करावी लागेल. या चार पर्यायांमधल्या कोणत्याही एकाला इम्पॅक्ट प्लेअर म्हणून वापरता येणार आहे. एखाद्या टीमने सुरुवातीच्या अकरा जणांमध्ये चार विदेशी क्रिकेटर्सचा समावेश केला तर ती टीम इम्पॅक्ट प्लेअर म्हणून टीममध्ये केवळ एका भारतीय क्रिकेटरचा समावेश करू शकते.

advertisement

प्रत्येक मॅचमध्ये विदेशी खेळाडूंची संख्या प्रति टीम चारपर्यंत मर्यादित ठेवणं हा त्याचा उद्देश आहे. एखाद्या टीमने त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये तीन किंवा त्यापेक्षा कमी विदेशी खेळाडूंना समाविष्ट केले तर ती टीम इम्पॅक्ट प्लेअर म्हणून एकाच विदेशी खेळाडूचा समावेश करू शकते; पण तिच्याकडे चार पर्याय असावेत.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
New Rule In IPL : आयपीएल 2024मध्ये लागू होणार 'हा' नियम; बॉलर्ससाठी ठरणार 'ब्रह्मास्त्रा'सारखा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल