आणि सनरायझर्स हैदराबाद या संघात सामना सूरू आहे. या सामन्याचा टॉस सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्सने जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लखनऊ सूपर जाएंट्स प्रथम फलंदाजीला उतरली आहे.
लखनऊच्या डावाच्या शेवटच्या षटकात ही घटना घडली. 26 बॉलमध्ये 45 धावा काढणारा पूरन तिसऱ्याच बॉलवर स्ट्राईक रिटेन करण्याचा प्रयत्न करत असताना नाट्यमय पद्धतीने धावबाद झाला.खरं तर शेवटच्या तीन
advertisement
बॉल खेळण्याच्या नादात तो आऊट झाला. खरं तर हा धोका पत्करल्यानेच तोच रनआऊट झाला.त्यानंतर तो प्रचंड निराश झाला होता.
बाद झाल्यानंतर स्पष्टपणे निराश झालेला पूरन डगआउटमध्ये परतला आणि ड्रेसिंग रूमच्या परिसरात रागाने हातमोजे फेकताना कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर ड्रेसिंग रूमच्या आत गेल्यानंतर संघाचे एकामागून एक पडल्यानंतर त्याने काचेवर पॅड फेकून मारला होता. त्यामुळे पुरनने संयम गमावला होता. या संदर्भातला आता व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.
लखनौ सुपर जायंट्स (प्लेइंग इलेव्हन): मिचेल मार्श, एडन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (w/c), आयुष बडोनी, अब्दुल समद, आकाश दीप, आवेश खान, रवी बिश्नोई, दिग्वेश सिंग राठी, विल्यम ओरूरके
सनरायझर्स हैदराबाद (प्लेइंग इलेव्हन): अभिषेक शर्मा, इशान किशन (w), नितीश कुमार रेड्डी, हेनरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, कामिंडू मेंडिस, पॅट कमिन्स (क), हर्षल पटेल, हर्ष दुबे, झीशान अन्सारी, एशान मलिंगा