नितीश 99 वर खेळत असताना टीम इंडियाची एकच विकेट शिल्लक होती. मोहम्मद सिराजने तीन बॉल खेळून काढले अन् नितीश रेड्डीकडे स्ट्राईक आली. मेलबर्नवरची प्रेक्षक नितीशच्या शचकाची वाट पाहत होते. नितीशने लॉग ऑनच्या दिशेने नितिशने खणखणीत फोर मारला अन् शतक पूर्ण केलं. त्यानंतर त्याने बॅट मैदानात गाडल्याचं सेलिब्रेशन केलं अन् बॅटच्या वर हेलमेट अडकवलं. एक हात वर करून जणू काही नवा योद्धा मैदानात उतरलाय, अशी घोषणाच नितीश रेड्डीने केली.
advertisement
नितीशचे वडील काय म्हणाले?
आमच्यासाठी हा स्पेशल दिवस आहे. मला आज खूप आनंद होतोय. मोहम्मद सिराजची शेवटची विकेट असल्याने आम्हाला खूप टेन्शन आलं होतं. पण नितीशने करून दाखवलं, आम्ही फक्त त्याच्यासाठी प्रार्थना करत होतो, असं नितीश कुमार रेड्डीचे वडील मुथय्या रेड्डी यांनी म्हटलं आहे.
नितीश कुमार रेड्डीच्या वडिलांनी आपल्या लेकासाठी खूप काही केलं आहे. मुलाच्या क्रिकेट करियरसाठी त्यांना आपली नोकरी सोडावी लागली. 25 वर्ष बाकी असताना त्यांनी निवृत्ती वेळेआधीच जाहीर केली. मुलाच्या करियरवर पूर्ण लक्ष केंद्रित केलं. आर्थिक परिस्थिती नसताना देखील त्यांनी मुलाला कधीही कसलीच गरज भासू दिली नाही. नितीश रेड्डीने शतक ठोकताच त्यांना अश्रू अनावर झाले अन् त्यांना मेहनतीचं फळ मिळालंय.
टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन - यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर) नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलियाची प्लेइंग इलेव्हन - उस्मान ख्वाजा, सॅम कोन्सटास, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, ॲलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड.