ईशान फक्त 8 रन्स करून आऊट
ईशान किशनने देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या जबरदस्त कामगिरीचा विचार करून त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले. ईशानने नंबर तीन वर फलंदाजी करताना आतापर्यंत अपेक्षित यश मिळालं नाहीये. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात ईशान फक्त 8 रन्स करून आऊट झाला. तर फिल्डिंगमध्ये देखील ईशान किशनने दोन कॅच सोडले. त्यामुळे आता भारताचा माजी वेगवान बॉलर वरुण एरॉन याने तिळक वर्माच्या रिप्लेसमेंटबाबत आपलं महत्त्वाचं मत मांडलं आहे.
advertisement
श्रेयस अय्यर हा सर्वात योग्य पर्याय
एरॉनच्या मते, जर टीमला बाहेरून एखादा खेळाडू निवडायचा असेल, तर श्रेयस अय्यर हा सर्वात योग्य पर्याय ठरू शकतो. अय्यर हा सध्या वन-डे टीमचा व्हाईस कॅप्टन देखील आहे. जर भारतीय संघाने स्क्वाडमधीलच खेळाडूंवर विश्वास दाखवायचा ठरवले, तर ईशान किशन हा देखील एक चांगला पर्याय असल्याचे एरॉनने नमूद केलं. पण श्रेयस विश्वासू खेळाडू असल्यानं संकटाच्या काळात तो मदतीला धावेल, असं वरुण एरॉनने म्हटलंय.
आकड्यांचा विचार केला तर...
दरम्यान, इशान किशनच्या आकड्यांचा विचार केला तर त्याने नंबर 3 वर खेळताना 4 मॅचमध्ये 114 रन्स केले आहेत. यामध्ये दोन हाफ सेंच्युरीचा समावेश आहे. मार्च 2023 मध्ये डेब्यु करणाऱ्या इशानने आतापर्यंत 32 मॅचमध्ये 25.56 च्या सरासरीने 796 रन्स बनवले आहेत. त्याने नोव्हेंबर 2023 नंतर आता पुन्हा एकदा भारतीय टी-20 टीममध्ये पुनरागमन केले आहे, जे त्याच्यासाठी एक महत्त्वाची संधी मानली जात आहे.
