युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलने शुभंकर मिश्राला मुलाखत दिली आहे.या मुलाखतीत त्याने अनेक मुद्यांवर भाष्य केले आहे.तसेच त्याला त्याचा आवडता भारतीय खेळाडू कोण? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर त्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली ऐवजी सरफराज खानच नाव घेतलं आहे.या मुलाखतीत ख्रिस गेल म्हणाला, सरफराज खान माझा आवडता खेळाडू आहे.तो किमान कसोटी संघात असायला हवा होता. तुम्हाला माहिती आहे, त्याने घरच्या मैदानावर शतक ठोकले, असे त्याने सांगितले.
advertisement
ख्रिस गेलने पुढे सरफराज खानच्या ट्रान्स्फॉर्मेशनवरही भाष्य केले आहे. मी काही दिवसांपूर्वी एक पोस्ट पाहिली.त्याचे वजन कमी झाले.वजन एकसारखे नव्हते, त्याच्या वजनात काहीही चूक नव्हती किंवा काहीही नव्हते.तो ठीक आहे.तो अजूनही धावा करत होता.त्या माणसाने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्रिशतके ठोकली.म्हणून जर ते त्याच्याविरुद्ध त्याचा वापर करत असतील तर ते दुःखद आहे. तुम्हाला माहिती आहे.त्यांनी त्याचा वापर त्याच्याविरुद्ध कधीही करू नये. तो तरुण आहे त्यामुळे 100 टक्के तो संघाचा भाग असायला हवा होता, असे गेलने सांगितले.
गेलचा मोठा खुलासा
ख्रिस गेलने पंजाब किंग्स संघाबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.पंजाब किंग्समध्ये असताना त्याला योग्य तो मान मिळाला नाही.एका वरिष्ठ खेळाडूप्रमाणे त्याच्याशी व्यवहार केला गेला नाही,उलट एका लहान मुलासारखे त्याच्याशी वागलं गेलं. त्यानंतर त्याने आयपीएलमधून आपला गाशा गुंडाळला होता.
ख्रिस गेलने सांगितलं की, या वागणुकीमुळे तो इतका निराश झाला होता की त्याला नैराश्यामध्ये (Depression) गेल्यासारखे वाटलं. त्याने सांगितले की, याबद्दल बोलताना तो प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासमोर अक्षरशः रडला होता, कारण त्याला खूप वाईट वाटले होते. संघाची व्यवस्थापन पद्धत आणि अनिल कुंबळे यांच्यामुळे तो निराश झाला होता.
तसेच या वागणुकीमुळे तो इतका निराश झाला होता की त्याला नैराश्यामध्ये (Depression) गेल्यासारखे वाटलं. त्याने सांगितले की, याबद्दल बोलताना तो प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यासमोर अक्षरशः रडला होता, कारण त्याला खूप वाईट वाटले होते. संघाची व्यवस्थापन पद्धत आणि अनिल कुंबळे यांच्यामुळे तो निराश झाला होता.