पावसाने व्यत्यय आणला तर...
जर सेमीफायनल वनच्या महत्त्वाच्या मॅचमध्ये पावसाने व्यत्यय आणला, तर आयसीसीने योग्य नियोजन केलंय. आयसीसीने दोन्ही सेमीफायनलसाठी 'रिझर्व्ह डे'ची तरतूद केली गेली आहे. नियोजित दिवशी खेळ पूर्ण करण्यासाठी मॅचच्या अधिकृत वेळेव्यतिरिक्त वाढीव 90 मिनिटं दिली जातील. पण तरीही पाऊस थांबला नाही, तर 5 मार्च हा दिवस रिझर्व्ह डे म्हणून वापरला जाईल, जेणेकरून फॅन्स पूर्ण 20 ओव्हरचा थरार पाहायला मिळेल.
advertisement
...तर आफ्रिकेला थेट फायदा मिळेल
न्यूझीलंडला नशिबाने साथ दिली नाही आणि रिझर्व्ह डेलाही पावसाने खेळ खराब केला, तर मात्र नियमांचा आधार घेतला जाईल. अशा परिस्थितीत सुपर 8 मधील कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या सुपर 8 ग्रुपमध्ये पहिलं स्थान पटकावलं होतं, तर न्यूझीलंडचा संघ इंग्लंडच्या मागं दुसऱ्या स्थानावर राहिला होता, ज्यामुळे आफ्रिकेला याचा थेट फायदा मिळेल.
हवामान अंदाजानुसार....
दरम्यान, हवामान अंदाजाबद्दल सांगायचं झालं तर, कोलकात्यात आकाश पूर्णपणे निरभ्र राहण्याची शक्यता आहे. तापमान साधारणपणे 29 डिग्री सेल्सिअसच्या आसपास असेल आणि रात्र जसजशी पुढे जाईल तसे ते 23 डिग्रीपर्यंत खाली येईल. त्यामुळे खेळाडूंना आणि प्रेक्षकांना पावसाची चिंता न करता क्रिकेटचा आनंद घेता येईल, असं चित्र सध्या तरी दिसत आहे. पण पाऊस नसला तरी मॅचमध्ये ड्यू फॅक्टर काम करणार आहे. त्यामुळे टॉस हा महत्त्वाचा ठरू शकतो.
