मुंबईने मारली बाजी
मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स हा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानात खेळला गेला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने बाजी मारली आणि दिल्ली कॅपिटल्सला पराभवाचा सामना करावा लागला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने टॉस जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि मुंबई इंडियन्सने फलंदाजी करत 180 धावांची खेळी खेळली. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 120/10 विकेट गमावत या सामन्यात पराभव पत्करला आणि या विजयासह मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफचा मार्ग मोकळा झाला.
advertisement
सोशल मीडियावर पेटला वाद
मुंबई इंडियन्सने फलंदाजी करत दिल्ली कॅपिटल्स समोर 180 धावांच लक्ष उभं केलं. या लक्षाचा पाठलाग करण्यात दिल्ली कॅपिटल्सला अपयश आलं आणि हा सामना मुंबई इंडियन्सच्या खात्यात गेला. पण या सामन्यात असं काही घडलं ज्याने सर्वांचं लक्ष वेधलं. 7 व्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर विप्राजची विकेट मुंबईच्या मिचेल सँटनरने घेतली. पण यात घडलं असं की हा बॉल बॉलर साइड नो बॉल होता तरीही अंपायरने विप्राजना बाद घोषित केले आणि या नंतर पुन्हा एकदा सोशल मीडियावर मॅच फिक्सिंगचा वाद पेटला.
या पूर्वीही अनेकवेळा मुंबई इंडियन्सवर असे आरोप करण्यात आले असून मुंबई इंडियन्सने नेहमीच त्यांच्या खेळाने हे आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे या ओव्हरमध्ये चूक नेमकी कोणाची होती हे अद्यापही स्पष्ट झालं नसून, सोशल मीडियावर मात्र चांगलीच चर्चा रंगली आहे.