बाडमेर : गावखेड्यातील पोरांसाठी महेंद्रसिंग धोनी प्रेरणेचा मोठा स्त्रोत आहे. त्यामुळे आता गावखेड्यातील पोरंही क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करताना दिसत आहे. आज अशाच एका तरुणाबाबत जाणून घेऊयात, ज्याच्यावर बेस प्राइसपेक्षा 8 पट जास्त बोली लागली.
राजस्थान राज्यातील बालोतराच्या बुडीवाडा गावात मल्लीनाथ प्रीमियर लीग सुरू आहे. दोन मोसम झाल्यानंतर आता मल्लीनाथ प्रीमियर लीगतच्या तिसऱ्या मोसमात बुडीवाडा वेलोरची टीम मैदानात अत्यंत चांगले प्रदर्शन करत आहे. यामध्ये आयपीएलच्या धर्तीवर एमपीएलमध्ये राहुल सिंगला मूळ किमतीपेक्षा 8 पट अधिक किमतीत खरेदी करण्यात आले आहे.
advertisement
सध्या पश्चिम राजस्थानच्या बालोतरा येथे क्रिकेटचा महाकुंभ सुरू आहे. जोधपूर येथील भगत की कोठी येथे राहणारा राहुल सिंग हा बालोतरा येथील असाडा येथे सुरू असलेल्या तिसऱ्या सत्रातील अष्टपैलू खेळाडू मानला जात आहे. राहुल सिंग गेल्या 10 वर्षांपासून क्रिकेट खेळत आहे. मामाकडून प्रेरणा घेऊन तो क्रिकेटच्या मैदानात उतरला. राहुलचे वडील गणपत सिंग सोलंकी लोकांच्या घरी पेंटर म्हणून काम करतात आणि त्याची आई अनिता कंवर गृहिणी आहेत.
एमपीएलच्या तिसऱ्या हंगामात राहुल सिंह हा सर्वात महागडा खेळाडू छरला आहे. राहुल सिंहची बेस प्राइस ही 5 हजार रुपये ठेवण्यात आली होती. यामध्ये त्याला 8 पट जास्त म्हणजे 43 हजार रुपयांमध्ये खरेदी करण्यात आले. राहुल सिंहने एमबीएचे शिक्षण घेतले आहे. भारतीय संघासाठी खेळण्याचे त्याचे स्वप्न आहे. तर या संघाचा कर्णधार सांवल देवासी हाउसिंग बोर्ड बालोतरा येथील रहिवासी आहे.
Ram Mandir : अयोध्येत राम मंदिरातील आरतीसाठी तुम्हालाही होता येईल सहभागी, ही आहे संपूर्ण प्रक्रिया
या संघात राहुल सिंह, सुरेंद्र गोदारा, रिछपाल सिंह, किशोर, राहुल सैनी, अंकित मंडल, प्रवीण विश्नोई, विक्रम सिंह, कमलेश, पृथ्वी सिंह, जीतू भाई मेहता, रफीक खान, नरपत सिंह, दुर्जन सिंह, निशाल शर्मा हे खेळाडू आहेत. संघाचे प्रशिक्षक महेंद्र प्रताप सिंह हे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ 100 टक्के योगदान देत आहेत.
या संघातील अनेक खेळाडू राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळलेले आहेत. या संघातील खेळाडूंच्या लिलावात राहुल सिंहला सर्वात महागडा खेळाडू म्हणून 43 हजार रुपयांना खरेदी करण्यात आले आहे. तर मागच्या मोसमात हा संघ अंतिम सामन्यात मागे पडला होता. यावेळी संघ अंतिम स्पर्धेत बाजी मारुन ही स्पर्धा जिंकणाच्या विचाराने मेहनत घेत आहे.