TRENDING:

PAK vs BAN : "मॅच जिंकता येत नाही, ICC ट्रॉफी चोरायची का?", कामरान अकमलचा LIVE कार्यक्रमात संयम सुटला!

Last Updated:

PAK vs BAN kamran akmal reaction : बांगलादेशविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पहायला मिळतंय. कामरान अकमलने अत्यंत तिखट शब्दांत आपल्याच टीमवर टीका केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Pakistan vs Bangladesh ODI : बांगलादेशची राजधानी ढाका इथं रविवारी झालेल्या निर्णायक मॅचमध्ये बांगलादेशने 5 विकेट्सच्या बदल्यात 290 धावा उभारल्या होत्या. ओपनर तंजीद हसनने 107 धावांची शानदार खेळी केली, तर लिटन दासने 41 आणि तौहीद हृदोयने नाबाद 48 धावांचे योगदान दिले. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानची झुंज 11 धावांनी अपुरी पडली आणि बांगलादेशने सिरीज 2-1 ने जिंकली. अशातच आता पाकिस्तानच्या माजी खेळाडूंचा संयम सुटला असून आता आयसीसी ट्रॉफी चोरायची का? अशी चर्चा पाकिस्तानमध्ये सुरू झाली आहे.
PAK vs BAN kamran akmal reaction
PAK vs BAN kamran akmal reaction
advertisement

पाकिस्तानमध्ये संतापाची लाट

बांगलादेशविरुद्धच्या वनडे सिरीजमध्ये झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानमध्ये संतापाची लाट उसळल्याचं पहायला मिळतंय. माजी विकेटकीपर-बॅट्समन कामरान अकमलने अत्यंत तिखट शब्दांत आपल्याच टीमवर टीका केली आहे. पाकिस्तानच्या क्रिकेटचा दर्जा इतका घसरला आहे की, आता नेदरलँडसारख्या टीम्सही पाकिस्तानसोबत खेळून आपल्याला 'टेस्ट नेशन'चा दर्जा मिळावा, असा विचार करत असतील, अशा शब्दांत अकमलने आपली नाराजी व्यक्त केली. त्यावेळी त्याचा पारा चांगलाच चढला होता.

advertisement

PAK vs BAN : 15 सेकंदांचा नियम मोडला? पाकिस्तानने ICC कडे केली अधिकृत तक्रार, कुणावर फोडलं पराभवाचं खापर!

आयसीसी ट्रॉफी चोरी करून आणायची का?

तिसऱ्या वनडेमधील निर्णयांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना अकमल म्हणाला की, बॅटिंगसाठी पोषक खेळपट्टी असतानाही पाकिस्तानने आधी बॅटिंग का केली नाही? बांगलादेशने 290 धावा केल्या, पण लिटन दास संथ खेळला नसता तर हा आकडा 350 च्या पार गेला असता. "जर तुम्ही जिंकणार नसाल, तर काय आयसीसी ट्रॉफी चोरी करून आणायची आहे का? ती खेळून जिंकावी लागते.", अशा शब्दात त्याने स्वत:च्या क्रिकेट टीमवर निशाणा साधला आहे.

advertisement

advertisement

ही खरी चिंतेची बाब - कामरान अकमल 

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
पारंपरिक चवीची अस्सल भेळ, पुण्यात एकाच ठिकाणी खा 3 प्रकार, किंमत 60 रुपये! Video
सर्व पहा

पाकिस्तानमधील एका खाजगी वाहिनीवर बोलताना कामरान अकमल म्हणाला, आपल्या क्रिकेटची अवस्था काय करून ठेवली आहे? मला तर वाटतं की नेदरलँडची टीम आता विचार करत असेल की पाकिस्तानसोबत 3 मॅचची सिरीज खेळूया, म्हणजे आम्हाला टेस्ट नेशनचा दर्जा मिळेल. तुम्ही क्रिकेटचा खेळ मांडला आहे. मॅच हरल्यानंतर कोणालाही याचे गांभीर्य वाटत नाही, ही खरी चिंतेची बाब आहे, असंही कामरान अकमल म्हणाला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PAK vs BAN : "मॅच जिंकता येत नाही, ICC ट्रॉफी चोरायची का?", कामरान अकमलचा LIVE कार्यक्रमात संयम सुटला!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल