अहमदच्या सेलिब्रेशनची नक्कल
जेव्हा पाकिस्तानची बॅटिंग सुरू होती, तेव्हा वनिंदू हसरंगाने महेश तिक्षणाच्या बॉलिंगवर फखर झमानला एका हाताने कॅच देऊन बाद केलं. कॅच घेतल्यानंतर, हसरंगाने पाकिस्तानचा खेळाडू अबरार अहमदच्या सेलिब्रेशनची नक्कल केली. त्यानंतर लगेचच, वनिंदूने सॅम अयुबला देखील बाद केलं आणि नंतर पाकिस्तानच्या ड्रेसिंग रूमकडे पाहत अबरारचा प्रसिद्ध सेलिब्रेशन केलं. त्यानंतर हसरंगा चांगलाच चर्चेत आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. पण त्याआधी असं काय घडलं? ज्यामुळे हसरंगला अबरारचं सेलीब्रेशन करावं लागलं?
advertisement
हसरंगाचं ट्रेडमार्क सेलिब्रेशन
तर झालं असं की, श्रीलंकेच्या बॅटिंग दरम्यान हसरंगाला अबरारने आऊट केलं. त्यानंतर अबरारने हसरंगाचा ट्रेडमार्क सेलिब्रेशन केलं होतं. त्याला प्रत्युत्तर देताना हसरंगाने अबरारचं विकेट सेलीब्रेशन केलं होतं. अबरारने नकळत हसरंगाचं सिलेब्रेशन केलं पण हा प्रकार त्याच्यावर उलटला. मात्र, त्यानंतर त्याला हसरंगाची माफी मागावी लागली.
पाहा Video
कशी रंगली मॅच?
दरम्यान, पाकिस्तानचा कर्णधार सलमान आगाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कामिंडू मेंडिसने एकहाती झुंज देत 44 बॉलमध्ये 50 धावांची अर्धशतकी खेळी केली. त्यामुळे श्रीलंका संघ 20 ओव्हर्समध्ये 8 विकेट्स गमावून 133 धावांपर्यंत पोहोचू शकला. मात्र, हुसैन तलत (32 धावा, नाबाद) आणि मोहम्मद नवाज (38 धावा, नाबाद) यांनी 58 धावांची अभेद्य पार्टनरशिप करत पाकिस्तानला 18 ओव्हर्समध्ये विजय मिळवून दिला. पाकिस्तानने श्रीलंकेचा 5 विकेट्सने पराभव केला. या विजयासह पाकिस्तानने एशिया कपच्या फायनलमध्ये पोहोचण्याची आपली आशा कायम ठेवली आहे.