पाईंट टेबलची परिस्थिती काय?
सध्याच्या गुणतालिकेनुसार, भारताने 1 मॅच जिंकून 2 पॉइंट्ससह अव्वल स्थान मिळवले आहे, तर पाकिस्तानने दोन मॅचपैकी एक जिंकून 2 पॉइंट्ससह दुसरा क्रमांक पटकावला आहे. बांगलादेश तिसऱ्या स्थानावर आहे. श्रीलंकेने मात्र दोन्ही मॅच गमावल्यामुळे त्यांचे आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. पाकिस्तानला फायनलमध्ये थेट प्रवेश मिळवण्यासाठी पुढील मॅचमध्ये बांगलादेशला हरवावे लागेल.
advertisement
...तर पाकिस्तानला गाठोडं बांधावं लागेल
बांगलादेशविरुद्ध जर पाकिस्तानने ही मॅच जिंकली तर त्यांचे 4 पॉइंट्स होतील आणि ते थेट फायनलमध्ये पोहोचतील. पण बांगलादेशने गेम केला तर पाकिस्तानला गाठोडं बांधावं लागेल. पाकिस्तानच्या पात्रतेसाठी भारताचा पुढील सामना खूप महत्त्वाचा ठरेल. जर भारताने 25 सप्टेंबरला बांगलादेशला हरवले, तर बांगलादेशचे आव्हान संपुष्टात येईल आणि पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील मॅच ही उपांत्य फेरीसारखी होईल. त्या मॅचचा विजेता संघ भारतासोबत फायनलमध्ये पोहोचेल.
पुन्हा एकदा भारत vs पाकिस्तान फायनल
दरम्यान, जर भारताने बांगलादेशला हरवले आणि नंतर पाकिस्तानने बांगलादेशला पराभूत केले, तर भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ 4 पॉइंट्ससह फायनलमध्ये पोहोचतील. या मॅचमध्ये श्रीलंकेच्या पराभवामुळे पाकिस्तानच्या चाहत्यांमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान फायनलची आशा निर्माण झाली आहे. 28 तारखेला फायनलचा सामना खेळवला जाईल.