मिळालेल्या माहितीनुसार, अर्सलान नासीर नावाच्या एका पाकिस्तानी युट्यूबरने 15 मिनिटांचा व्हिडीओ केला. हा व्हिडीओमध्ये कॉमेडी आणि क्रिकेट रिव्ह्यूच्या नावाखाली पोस्ट करण्यात आला असला, तरी त्यात तो जे बोलला आहे ते आक्षेपार्ह आहे. यामध्ये त्याने ICC आणि BCCI वर टीका केली. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जगभरातून संताप व्यक्त केला जात आहे.
advertisement
या युट्यूबरने केवळ धमकी देऊनच थांबले नाही, तर भारतीय क्रिकेटपटूंनाही लक्ष केले आहे. विशेषतः भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबद्दल त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टिप्पणी केली आहे. सीमारेषा ओलांडणाऱ्या या वक्तव्यामुळे भारतीय चाहत्यांमध्ये तीव्र संताप असून, अशा प्रवृत्तींवर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.
15 फेब्रुवारी रोजी श्रीलंकेतील कोलंबो येथे भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना नियोजित आहे. मात्र, पाकिस्तानने या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली आहे. यावर आयसीसीने स्पष्ट केले आहे की, जर पाकिस्तानने सामना खेळण्यास नकार दिला, तर त्यांच्यावर मोठा दंड आकारला जाईल आणि भविष्यात त्यांच्यावर बंदीही घातली जाऊ शकते. या कडक भूमिकेमुळे पाकिस्तानमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली असून, त्यातूनच अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचे बोलले जात आहे.
सध्या आयसीसी आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरू असल्याचे वृत्त आहे. मात्र, क्रिकेटच्या मैदानातील हा संघर्ष आता धमक्यांपर्यंत पोहोचल्याने दोन्ही देशांतील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे.
