TRENDING:

PSL 2026 : पहिलाच सामना अन् पाकिस्तानने लाज घालवली; ऑस्ट्रेलियाचा स्टार म्हणाला, करीअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

Last Updated:

लीगच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने जगासमोर आपली लाग घालवली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अशा वागण्यावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि हैदराबाद किंग्समेन्सचा कर्णधार देखील वैतागला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
PSL 2026 : पाकिस्तान सूपर लीगला आज 26 मार्च 2026 पासून सूरूवात झाली आहे. या लीगच्या पहिल्याच सामन्यात पाकिस्तानने जगासमोर आपली लाग घालवली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या अशा वागण्यावर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि हैदराबाद किंग्समेन्सचा कर्णधार देखील वैतागला आहे.त्यामुळे पाकिस्तानने लीगच्या पहिल्याच दिवशी लाज घालवली आहे.
psl 2026 marnus labuschagne
psl 2026 marnus labuschagne
advertisement

खरं तर पाकिस्तानी सुपर लीगमध्ये आज लाहोर कलंदर आणि हैदराबाद किंग्समेने यांच्यात सामना खेळवला जात आहे. आज हा सुपर लीगचा पहिलाच सामना होता, त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांचे याकडे लक्ष होते. असे असताना पाकिस्तानने मोठी माती खाल्ली आहे. पाकिस्तानने लीगचा पहिलाच सामना जवळपास 15 ते 20 मिनिटं उशिराने सूरू केला होता.त्यामुळे ही घटना पाहून ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आणि हैदराबाद किंग्समेन्सचा कर्णधार मार्नस लाबुशेन प्रचंड वैतागला होता आणि त्या घटनेवर नाराजी व्यक्त केली होती.

advertisement

टॉस पार पडसल्यानंतर मार्नस लाबुशेनला विचारण्यात आले, आजचा सामना खेळण्यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात? यावर मार्नस लाबुशेन म्हणाला,"माझ्या कारकिर्दीत पहिल्यांदाच असं घडलं आहे. कोणतही ठोस कारण नसताना सामना 15 मिनिटे उशिरा सुरू झाला. खरं सांगायचं तर, हे फक्त पीएसएल मध्येच शक्य आहे,असे म्हणत त्याने पाकिस्तानी लीगची खिल्ली उडवली होती.

जर्सी आणि बॉलवरूनही पाकिस्तान ट्रोल

advertisement

पीएसएल संघांची अवस्था इतकी वाईट आहे की त्यांनी इतक्या स्वस्त, निकृष्ट दर्जाच्या जर्सी बनवल्या आहेत की त्यांचा रंग उडू लागला आहे आणि बॉलचा रंग पांढऱ्यावरून गुलाबी झाला आहे. या संदर्भातले फोटो देखील व्हायरल झाले आहेत.त्यामुळे पाकिस्तानच्या लीगचा दर्जा काय आहे. हे जगाने आज पाहिला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबाच्या दरात पुन्हा वाढ, कांद्याला भाव नाहीच, केळीची काय स्थिती? Video
सर्व पहा

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर शाहिन आफ्रीदीच्या लाहोर लखंदरने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 199 धावा केल्या होत्या. फखर जमानने सर्वाधित 53 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. या व्यक्तिरीक्त हसीबुल्लाह खानने 40 धावांची नाबाद खेळी केली आहे. तर सिकंदर रझाच्या 24 धावांच्या खेळीच्या बळावर लाहोर लखंदरने 199 धावा केल्या होत्या.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : पहिलाच सामना अन् पाकिस्तानने लाज घालवली; ऑस्ट्रेलियाचा स्टार म्हणाला, करीअरमध्ये पहिल्यांदाच असं घडलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल