TRENDING:

PSL 2026 : खेळाडूंची माघार, प्रेक्षकही नाहीत... पाकिस्तान घाबरलं, तालिबानच्या भीतीने पीएसएलचा फज्जा!

Last Updated:

तालिबानकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : तालिबानकडून होत असलेल्या हल्ल्यांमुळे आणि सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलबद्दल मोठा निर्णय घेतला आहे. 26 मार्च पासून पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) ला सुरूवात होणार आहे, पण पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील तणावपूर्ण वातावरण आणि पश्चिम आशियामधल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे पीएसएल संकटात सापडलं होतं, त्यातच आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलबद्दल मोठं पाऊल उचललं आहे.
खेळाडूंची माघार, प्रेक्षकही नाहीत... पाकिस्तान घाबरलं, तालिबानच्या भीतीने पीएसएलचा फज्जा!
खेळाडूंची माघार, प्रेक्षकही नाहीत... पाकिस्तान घाबरलं, तालिबानच्या भीतीने पीएसएलचा फज्जा!
advertisement

पाकिस्तान सुपर लीगचे सामने यंदा प्रेक्षकांशिवाय तसंच कराची आणि लाहोर या दोन शहरांमध्येच आयोजित केले जाणार आहेत. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी पत्रकार परिषद घेऊन याची माहिती दिली आहे. परिस्थिती सामन्य होत नाही, तोपर्यंत स्टेडियममध्ये प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, तसंच पीएसएल 2026 ची ओपनिंग सेरेमनीही होणार नसल्याचं नक्वी यांनी स्पष्ट केलं.

advertisement

पीएसएलचा प्लान काय?

'पीएसएल आमचा इंटरनॅशनल ब्रँड आहे, तसंच या स्पर्धेत बरेच परदेशी खेळाडू सहभागी होतात, त्यामुळे आम्ही स्पर्धा रद्द करू शकत नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये 25-30 हजार लोकांना स्टेडियममध्ये आणणं शक्य नाही. पाकिस्तान सरकार, पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि सुरक्षा यंत्रणांसोबत अनेक बैठका झाल्या. देशाची प्राथमिकता लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे', अशी प्रतिक्रिया मोहसिन नक्वी यांनी दिली आहे.

advertisement

'आम्ही लोकांना प्रवास कमी करायला सांगत आहोत, त्यामुळे रोज हजारो प्रेक्षकांना स्टेडियममध्ये बोलाणं योग्य नाही, म्हणून हा कठीण निर्णय आम्हाला घ्यावा लागत आहे. सर्व टीमना प्रेक्षकांशिवाय होणाऱ्या सामन्यामुळे होत असलेल्या नुकसानीची भरपाई दिली जाईल. तसंच ज्या चाहत्यांनी तिकीट विकत घेतली आहे, त्यांना पुढच्या 72 तासांमध्ये रिफंड दिला जाईल', अशी माहितीही मोहसिन नक्वी यांनी दिली.

advertisement

पाकिस्तानमध्ये इंधन संकट असल्यामुळे लोकांना प्रवास कमी करायला सांगण्यात आलं आहे. शाळा बंद करण्यात आल्या आहेत आणि वर्क फ्रॉम होम लागू केलं गेलं आहे, याशिवाय ईदच्या सुट्ट्याही वाढवल्या गेल्या आहेत, असं नक्वी म्हणाले.

पीएसएलमध्ये 8 टीम

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: द्राक्षं, केळीचं मार्केट हाललं; कांदा, लिंबूला शनिवारी किती मिळाला भाव?
सर्व पहा

यंदाच्या पीएसएलमध्ये एकूण 44 सामने खेळवले जाणार आहेत. स्पर्धा 26 मार्च ते 3 मे पर्यंत होईल. यावेळी पहिल्यांदाच 8 टीम सहभागी होणार आहेत, ज्यात हैदराबाद किंग्समन, इस्लामाबाद युनायटेड, कराची किंग्स, लाहोर कलंदर्स, मुल्तान सुल्तान्स, पेशावर झल्मी, क्वेटा ग्लॅडिएटर्स आणि रावळपिंडी पिंडीज यांचा समावेश आहे. पीएसएलमध्ये प्रत्येक टीम 10-10 मॅच खेळणार आहे, पॉईंट्स टेबलमधल्या टॉप-4 टीम प्ले-ऑफमध्ये दाखल होतील, यानंतर प्ले-ऑफमध्ये क्वालिफायर 1, एलिमिनिटेर, क्वालिफायर 2 आणि फायनल खेळवली जाईल. पीएसएलची फायनल 3 मे रोजी गडाफी स्टेडियममध्ये होईल. पाऊस पडला तर पुढचा दिवस राखीव ठेवण्यात आला आहे.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
PSL 2026 : खेळाडूंची माघार, प्रेक्षकही नाहीत... पाकिस्तान घाबरलं, तालिबानच्या भीतीने पीएसएलचा फज्जा!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल