राजस्थानने ठेवली अट
राजस्थान रॉयल्सने सीएसकेकडे संजू सॅमसनच्या बदल्यात रवींद्र जडेजा, ऋतुराज गायकवाड आणि शिवम दुबे यांच्यापैकी एका खेळाडूला त्यांना देण्याची मागणी केली आहे, पण सीएसकेने याबद्दल राजस्थान रॉयल्सना अजून उत्तर दिलेलं नाही, असं वृत्त समोर आलं आहे.
आयपीएल लिलावाच्या एक आठवडा आधीपर्यंत ट्रेड विंडो खुली असते, त्यामुळे दोन्ही फ्रॅन्चायजी एक तर कॅश डील किंवा खेळाडू अदलाबदली करण्यावर सहमत होतात. संजू सॅमसनने साथ सोडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राजस्थान रॉयल्सने अनेक फ्रॅन्चायजींना संपर्क केला आहे, पण यात सीएसके संजूसाठी जास्त आग्रही आहे.
advertisement
सीएसकेशिवाय केकेआरलाही संजू सॅमसनला टीममध्ये घेण्याची इच्छा आहे, पण स्वत: संजूला सीएसकेकडून खेळायचं आहे. आयपीएल संपल्यानंतर संजूने अमेरिकेत जाऊन सीएसके मॅनेजमेंट आणि त्यांचे मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग याचीही भेट घेतल्याचं वृत्त आहे. संजू सॅमसन हवा असेल तर ऋतुराज गायकवाड, रवींद्र जडेजा आणि शिवम दुबे यांच्यापैकी एक खेळाडू द्यायची अट राजस्थानने सीएसके समोर ठेवली आहे. आता सीएसके राजस्थानची ही मागणी मान्य करणार का? यावरच ही डील फायनल होणार का याचा निर्णय होईल.