टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकु सिंह यांच्या वडील खानचंद सिंह यांचे आज नोएडातील यथार्थ हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. खानचंद सिंह हे 58 वर्षांचे होते आणि त्यांना फोर्थ स्टेजचा कॅन्सर झाला होता. त्यामुळे मागच्या अनेक दिवसांपासून त्यांच्यावर ग्रेटर नोएडाच्या खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सूरू होते. या रुग्णालयाचे डॉ. सुनील कुमार यांना रिंकु सिंहच्या वडील लिवर कॅन्सच्या आजाराशी झुंज देत होते,अशी माहिती दिली होती.पण आज अखेर ही झुंज अपयशी ठरली होती.
advertisement
खानचंद सिंह यांची नुकतीच तब्येत खराब झाली होती. ज्यामुळे 21 फेब्रुवारी 2026 पासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सूरू होता.या उपचारा दरम्यान त्यांना व्हेंटीलेटरच्या सपोर्टवर ठेवण्यात आले होते. पण शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता,अशी माहिती डॉ. सुनील कुमार यांनी सांगितले.
दरम्यान खानचंद सिंह यांच ज्यावेळेस निधन झालं तेव्हा रिंकु सिंह टीम इंडियासोबत होता.टीम इंडियाने आदल्याच दिवशी झिम्बाबेचा पराभव केला होता.या सामन्यात रिंकु सिंहला संधी मिळाली नव्हती.पण मैदानात फिल्डींग करताना तो दिसला होता.त्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी कळताच तो घरी निघाला होता.
रिंकु सिंहच्या वडिलांवर अंतिम संस्कार अलीगडमध्ये करण्यात आले होते. रिंकु सिंहने यावेळी वडिलांना खांदा दिला होता. हा खांदा देताना रिंकु डोळ्यात अश्रू आले होते. तो या घटनेने पुर्णपणे तुटला होता. पण स्वत:ला सावरत वडिलांना शेवटचा निरोप देत होता.त्यामुळे रिंकु सिंह आपल्या वडिलांना शेवटचा निरोप देत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे.
