मोहम्मद शमी आता निळ्या जर्सीत
लखनऊने आयात केलेला हा प्लेयर दुसरा तिसरा कुणी नसून मोहम्मद शमी आहे. मोहम्मद शमी आता सनरायझर्स हैदराबाद (SRH) टीममधून लखनऊ सुपर जायंट्स (LSG) मध्ये ट्रेड झाला आहे. IPL 2025 सिझनपूर्वी 10 कोटी रुपयांना SRH ने त्याला विकत घेतले होते. आता तो त्याच किंमतीत LSG कडून खेळणार आहे. 2013 मध्ये डेब्यू केल्यापासून, शमीने 119 आयपीएल मॅचेसमध्ये 5 फ्रँचायझींचे प्रतिनिधित्व केलं आहे.
advertisement
पर्पल कॅप विनर
हैदराबादमध्ये येण्यापूर्वी तो गुजरात टायटन्सचा महत्त्वाचा भाग होता आणि 2023 मध्ये 17 मॅचमध्ये 28 विकेट्स घेऊन पर्पल कॅप जिंकली होती. 2024 सिझनमध्ये दुखापतीमुळे तो खेळू शकला नसला तरी, 2023 मध्ये गुजरातच्या टायटल विजयात त्याने 20 विकेट्सचे मोठे योगदान दिलं होतं.
नीतीश राणाची दिल्लीत एन्ट्री
तर दुसरीकडे, डाव्या हाताचा बॅटर नीतीश राणा आता राजस्थान रॉयल्स (RR) कडून दिल्ली कॅपिटल्स (DC) मध्ये ट्रेड झाला आहे. आयपीएल 2025 सिझनच्या लिलावात राजस्थानने त्याला 4.2 कोटी रुपयांना विकत घेतले होते आणि तो याच किमतीत दिल्लीकडून खेळणं सुरू ठेवेल. 100 हून अधिक आयपीएल मॅचेस खेळण्याचा अनुभव असलेल्या राणाने 2023 मध्ये श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर असताना कोलकाता नाईट रायडर्सचे कॅप्टनपद यशस्वीपणे सांभाळलं होतं.
