TRENDING:

Rohit Sharma : 'हिटमॅन'ने राडा केला, Vijay Hazareमध्ये गोलंदाजांना धु धु धूतल, वादळी खेळीचा पहिला VIDEO

Last Updated:

खरं तर आज विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सिक्कीम विरूद्ध सामना पार पडला होता. या सामन्यात मुंबईकडून खेळताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने 94 बॉलमध्ये 155 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान रोहितने 9 षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma Video : विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोन्ही खेळाडूंनी मैदानात राडा केला होता. कारण या दोन्ही खेळाडून आजच्या सामन्यात वादळी खेळी केली होती. या खेळीचे आता व्हिडिओ देखील व्हायरल होत आहेत. त्यात आता रोहित शर्माचा खेळीचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत नेमकं काय आहे?हे जाणून घेऊयात.
rohit sharma
rohit sharma
advertisement

खरं तर आज विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचा सिक्कीम विरूद्ध सामना पार पडला होता. या सामन्यात मुंबईकडून खेळताना टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्माने 94 बॉलमध्ये 155 धावांची वादळी खेळी केली होती.या खेळी दरम्यान रोहितने 9 षटकार आणि 18 चौकार लगावले आहेत. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 164 होता.रोहितने अशाप्रकारे ही वादळी खेळी करून 30 ओव्हरमध्येच मॅच संपवली आहे. त्यामुळे मुंबईने सिक्कीमवर दणदणीत विजय मिळवला आहे.

advertisement

रोहित शर्माच्या या खेळीचा आता व्हिडिओ समोर आला आहे.या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा तुफान फटकेबाजी करताना दिसतो आहे. विशेष म्हणजे रोहित शर्मा प्रत्येक शॉर्ट खूपच जोराने खेळतोय. जेणेकरून प्रत्येक बॉलवर 6 किंवा 4 धावा काढता येतील.हा व्हिडिओ पाहून रोहित शर्मा किती वादळी खेळी करतो आहे,याचा अंदाजा येतो आहे.

advertisement

कसा रंगला सामना

खरं तर सिक्कीमने प्रथम फलंदाजी करताना 50 ओव्हरमध्ये 7 विकेट गमावून 236 धावा ठोकल्या होत्या. सिक्कीमकडून आशिष थापाने 79 धावांची अर्धशतकीय खेळी केली होती. मुंबईकडून यावेळी कर्णधार शार्दुल ठाकूर 2, तुषार देशपांडे, तनुश कोटीयन, शम्स मुलानी आणि मुशीर खानने प्रत्येकी 1 विकेट काढली आहे.

advertisement

या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईकडून रोहित शर्माने 155 धावांचीद दीड शतकीय खेळी केली. या खेळीच्या बळावर मुंबईने 30.3 ओव्हरमध्ये हे लक्ष्य गाठत हा सामना जिंकला आहे.दरम्यान सिक्कीमकडून क्रांथी कुमार आणि अंकुर मलिकने प्रत्येकी 1 विकेट घेतली होती. हा सामना जिंकून मुंबईने चांगली सूरूवात केली आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
चिकन, मटणपेक्षा महाग झाली ही भाजी, प्रोटीनच्या बाबतीत मासेही काहीच नाही!
सर्व पहा

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : 'हिटमॅन'ने राडा केला, Vijay Hazareमध्ये गोलंदाजांना धु धु धूतल, वादळी खेळीचा पहिला VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल