TRENDING:

'दोन नाही तर रितिकाला 3 मुलं' असं का म्हणतात युजर्स, रोहितचा VIDEO पाहून म्हणाल अगदी बरोबर!

Last Updated:

मुंबई इंडियन्सच्या फोटोशूटदरम्यान रोहित शर्माने पार्टी पॉपरने सपोर्ट स्टाफची मजेशीर खोडी काढली, हा व्हिडिओ व्हायरल, सोशल मीडियावर रितिका आणि रोहितवर कमेंट्स

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
रोहित म्हणजे टीममधील एक वेगळीच ऊर्जा आहे. रोहित मैदानावर कायम टीमसोबत हलकं फुलकं वातावरण राहावं यासाठी प्रयत्न करत असतो. टीममध्ये तो मज्जा मस्करी करत असतो. रोहितचा खोडकरपणा फक्त टीमपुरताच नाही तर सपोर्ट स्टाफसोबतही पाहायला मिळला आहे. मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंच्या फोटोशूट दरम्यान रोहित शर्मा एकदम लहान मुलासारखं वागत होता. ते पाहून तिथे असलेल्या सपोर्ट स्टाफलाच हसू आवरेनासं झालं. फोटोशूटसाठी Party Popper आणले होते. ते पाहून रोहितला मस्करी करायचा मूड झाला. फोटो शूट करत असताना पार्टी पॉपर फोडायचं असं ठरलेलं होतं. हे फोटोशूट झाल्यानंतर रोहितने त्यातलंच एक पार्टी पॉपर आपल्या जर्सीमध्ये गुपचूप लपवून ठेवलं. या पार्टी पॉपरच्या मदतीनं त्याने सपोर्ट स्टाफची फिरकी घ्यायची ठरवली.
News18
News18
advertisement

रोहित पार्टी पॉपर आपल्या जर्सीमध्ये लपवतो. त्यानंतर लक्ष नसताना मुंबई इंडियन्सच्या टीममधील एका सपोर्ट स्टाफच्या मागे जाऊन जोरात हा पार्टी पॉपर फोडतो. टीममधील सपोर्ट स्टाफ एकदम घाबरून जातो. रोहितला बाकीचे सपोर्ट करतात, सगळे सपोर्ट स्टाफच्या घाबरण्याची मजा घेतात. लहान मुलांसारखं खोड्या काढण्याचा रोहितचा हा मिश्कील स्वभाव पाहून सगळेच मजा घेतात आणि खळखळून हसतात.

advertisement

रोहित शर्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रितिकाला दोन मुलांना नाही तर तीन मुलांना सांभाळावं लागतं अशा कमेंट्स सोशल मीडियावर युजर्स करत आहेत. त्यातलं पहिलं मूल हे रोहितच आहे असंही एका युझरने म्हटलं आहे. त्यानंतर दोन्ही मुलांचा नंबर येतो. रोहित अगदी लहान मुलांसारखं खोड्या काढताना मनमोकळं हसताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा बिनधास्त भाऊ आहे असंही एका युजरने कमेंट केली आहे.

advertisement

मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंचं फोटोशूट सुरू असताना रोहित पॉपर पहिल्यांदा फोडायचा प्रयत्न करतो मात्र तेव्हा फुटत नाही. दुसऱ्यांदा फुटतं मात्र फोटो पुन्हा शूट करायचा असं ठरतं. तिसऱ्यावेळी पॉपर फोडल्यानंतर खेळाडूही दोन सेकंदासाठी दचकतो.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
उन्हाळ्यात कैरीचं लोणचं खाऊन कंटाळा येतोय? बनवा खास तक्कू, रेसिपीचा संपूर्ण Video
सर्व पहा

त्यामुळे रोहितलाही हसू आवरत नसतं आणि तो हसायला लागतो. त्यांच्या या मजामस्तीचा व्हिडीओ मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
'दोन नाही तर रितिकाला 3 मुलं' असं का म्हणतात युजर्स, रोहितचा VIDEO पाहून म्हणाल अगदी बरोबर!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल