TRENDING:

Rohit Sharma : वसीम अक्रमला पाहताच हिटमॅनने घेतली गळाभेट, मॅचपूर्वीचा 'तो' हृदयस्पर्शी क्षण, पाहा Video

Last Updated:

Rohit Sharma met Wasim Akram : भारत पाकिस्तानच्या सामन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बासिटर असलेल्या रोहित शर्माने देखील हजेरी लावली होती. यावेळी पाकिस्तानचा माजी स्टार बॉलर वसीम अक्रम देखील उपस्थित होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
Rohit Sharma Viral Video : संपूर्ण क्रिकेटविश्वाचे लक्ष लागून राहिलेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघाने 61 धावांनी दणदणीत विजय मिळवला. अशातच टीम इंडियाने पाकिस्तानचा चांगलाच इंगा दाखवला आहे. भारत पाकिस्तानच्या सामन्यात टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बासिटर असलेल्या रोहित शर्माने देखील हजेरी लावली होती. यावेळी पाकिस्तानचा माजी स्टार बॉलर वसीम अक्रम देखील उपस्थित होता. अशातच दोघांच्या भेटीची चर्चा होताना दिसत आहे.
Rohit Sharma Viral Video met Wasim akram
Rohit Sharma Viral Video met Wasim akram
advertisement

वसीम अक्रमला मिठी

आर. प्रेमदासा स्टेडियममध्ये औपचारिक समारंभाच्या आधी म्हणजेच मॅच सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू वसीम अक्रमला मिठी मारताना दिसला. सामन्यापूर्वीच्या समारंभात या दोघांनाही मिठी मारताना, हस्तांदोलन करताना आणि थोड्या गप्पा मारताना दिसले, हा हृदयस्पर्शी क्षण सोशल मीडियावर व्हायरल झाला. सोशल मीडयावर सध्या रोहित शर्माचं कौतुक होताना दिसत आहे. तर दुसरीकडे तो टीकेचा धनी झालाय.

advertisement

हँडशेक करण्यास नकार

भारत आणि पाक या सामन्यापूर्वी पाकिस्तानकडून बरीच वक्तव्यं झाली. आधी सामना बहिष्काराचा इशारा, त्यानंतर आयसीसीच्या फटकारणीनंतर माघार अशा सगळ्या घडामोडींनी वातावरण तापलं होतं. तर भारताने पाकिस्तानच्या प्लेयर्सला हँडशेक देखील करण्यास नकार दिला. त्यामुळे रोहितने गळाभेट घेणं चुकीचं होतं, असं काही नेटकऱ्यांचं म्हणणं आहे. पण क्रिकेटच्या भावनेतून रोहितने योग्य केलं, असं देखील म्हटलं जातंय.

advertisement

advertisement

रोहित शर्मा हा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा ब्रँड अॅम्बासिटर आहे. त्यामुळे तो मुंबईवरून थेट श्रीलंकेला पोहोचला होता. मॅच झाल्यानंतर आता मुंबईला पुन्हा आपल्या घरी आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
जालन्याच्या शेतकऱ्यानं घेतलं पैशाचं पीक! एका एकरात 10 लाखांची कमाई, काय केलं? Vi
सर्व पहा

दरम्यान, पाकिस्तानी स्पिनर्सच्या भीती घालून टीम इंडियाला कमकुवत करण्याचा डाव फसला. टीम इंडियाच्या बॅटर्सने आपल्या आक्रमक शैलीत 175 धावा स्कोरबोर्डावर उभा केल्या होत्या. त्याला प्रत्युत्तर देताना पाकिस्तानचा संघ 114 धावाच करू शकला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Rohit Sharma : वसीम अक्रमला पाहताच हिटमॅनने घेतली गळाभेट, मॅचपूर्वीचा 'तो' हृदयस्पर्शी क्षण, पाहा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल