TRENDING:

रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड तुटला, मुंबई इंडियन्सच्या पोरीचं वादळी शतक, T20 मध्ये घडला नवा इतिहास!

Last Updated:

टी-20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये रोहित शर्माने केलेला वर्ल्ड रेकॉर्ड अखेर तुटला आहे. मुख्य म्हणजे मुंबई इंडियन्सच्याच खेळाडूनेच रोहितला मागे टाकलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : टी-20 क्रिकेटच्या इतिहासामध्ये रोहित शर्माने केलेला वर्ल्ड रेकॉर्ड अखेर तुटला आहे. मुख्य म्हणजे मुंबई इंडियन्सच्याच खेळाडूनेच रोहितला मागे टाकलं आहे. न्यूझीलंडची स्टार ऑलराऊंडर एमिलिया केरने टी-20 क्रिकेटमध्ये नवा इतिहास घडवला आहे. क्राईस्टचर्चच्या हेगले ओव्हलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पाचव्या टी-20 सामन्यात केरने फक्त 55 बॉलमध्ये 105 रनची वादळी खेळी केली. केरच्या या शतकामुळे न्यूझीलंडचा विजय झाला, तसंच तिने स्वत:च्या नावावर नवा विश्वविक्रमही केला.
रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड तुटला, मुंबई इंडियन्सच्या पोरीचं वादळी शतक, T20 मध्ये घडला नवा इतिहास!
रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड तुटला, मुंबई इंडियन्सच्या पोरीचं वादळी शतक, T20 मध्ये घडला नवा इतिहास!
advertisement

एमिलियाने रोहितला मागे टाकलं

एमिलिया केरने आता टी-20 आंतरराष्ट्रीय (पुरुष आणि महिला) लागोपाठ सर्वाधिकवेळा 30 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर करण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. एमिलियाने लागोपाठ 11 टी-20 आंतरराष्ट्रीय इनिंगमध्ये 30 किंवा त्यापेक्षा जास्त स्कोअर केला आहे. एमिलियाने श्रीलंकेची चमारी अटापट्टू आणि रोमानियाच्या रेबेका ब्लॅक (9 वेळा) यांचं रेकॉर्ड मोडलं आहे. पुरुष क्रिकेटमध्ये हे रेकॉर्ड संयुक्तरित्या रोहित शर्मा, मोहम्मद रिझवान आणि अभिषेक शर्मा यांच्या नावावर होतं, या तिघांनीही लागोपाठ 7 वेळा 30 किंवा त्यापेक्षा जास्तचा स्कोअर केला आहे.

advertisement

एमिलिया केरचा धमाका

मागच्या काही काळापासून एमिलिया केर उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. मागच्या 11 इनिंगमध्ये एमिलियाने 140 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने 669 रन केले आहेत. एमिलियाने दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे या टीमविरुद्ध मोठा स्कोअर केला आहे, ज्यात दोन शतकं (105 रन आणि 101 रन) आहेत. बॅटिंगसोबतच एमिलियाने बॉलिंगमध्येही चमकदार कामगिरी करत 12 विकेट घेतल्या. एमिलिया महिला टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये एक हजार रन आणि 100 विकेट सगळ्यात जलद घेणारी पूर्ण सदस्य देशाची खेळाडूही बनली आहे.

advertisement

न्यूझीलंडचा 4-1 ने ऐतिहासिक विजय

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिकारीचे हत्यार तयार करणारे हात जेव्हा हार्मोनियम, तबला तयार करू लागले, मिरजकर म्युझिकल्सची कहाणी
सर्व पहा

पाचव्या टी-20 सामन्यात एमिलिया केरच्या 105 रनच्या खेळीमुळे न्यूझीलंडने 194-6 चा मोठा स्कोअर उभारला, त्यामुळे दक्षिण आफ्रिकेला आणखी एका पराभवाचा धक्का लागला. न्यूझीलंडने 5 टी-20 मॅचची ही सीरिज 4-1 ने जिंकली. एमिलिया केरने सीरिजमध्ये 78, 32, 31 आणि 105 रनच्या खेळी केल्या, ज्यामुळे न्यूझीलंडला सीरिजमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला.

advertisement

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
रोहितचा वर्ल्ड रेकॉर्ड तुटला, मुंबई इंडियन्सच्या पोरीचं वादळी शतक, T20 मध्ये घडला नवा इतिहास!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल