जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचं कौतुक
यंदाच्या आयपीएल हंगामात सलग 3 विजय मिळवणं ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट असल्याचं रियान परागने सांगितलं. टीमच्या बॉलिंगवर बोलताना रियानने जोफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर यांचं कौतुक केलं. त्यावेळी त्याने राजस्थान रॉयल्सचा प्लॅन देखील समजवून सांगितला. जोफ्राला फक्त वेगाने बॉल टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत आणि तो तसेच करत आहे. 145 ते 150 च्या वेगाने बॉल टाकून त्यावर इतके नियंत्रण ठेवणं ही खरंच थक्क करणारी गोष्ट आहे, असंही रियान पराग म्हणाला.
advertisement
आयपीएलमधील नंबर 1 ओपनिंग जोडी
वैभव सूर्यवंशी आणि यशस्वी जयस्वाल या दोघांच्या टॅलेंट आणि मॅचमधील परिस्थितीनुसार खेळण्याच्या पद्धतीमुळे ही जोडी सध्या आयपीएलमधील नंबर 1 ओपनिंग जोडी असल्याचे रियान परागने म्हटले. जयस्वाल गेल्या 3-4 वर्षांपासून सातत्याने चांगली कामगिरी करत आहे, तर वैभवने अहमदाबादमधील मॅचमध्ये ज्या पद्धतीने परिस्थितीचा अंदाज घेऊन बॅटिंग केली, ते पाहून मी प्रभावित झालो, असंही रियान पराग यावेळी म्हणाला. सध्यातरी सगळं सुरळीत चाललंय असं वाटतंय, असं म्हणत रियानने टीमवर विश्वास व्यक्त केला.
मुंबई इंडियन्सला 11 ओव्हरमध्येच गुडघ्यावर
दरम्यान, तुम्हाला माहिती नसेल तर राजस्थान रॉयल्सची बॉलिंग आणि बॅटिंग चांगलीच आक्रमकता दाखवत आहे. आयपीएलची पर्पल कॅप रवी बिश्वोईकडे असून ऑरेंज कॅप यशस्वी जयस्वालकडे आहे. तर रियान परागच्या स्मार्ट कॅप्टन्सीच्या जोरावर राजस्थानने मुंबई इंडियन्सला 11 ओव्हरमध्येच गुडघ्यावर आणलं. मुंबईच्या बॅटर्स राजस्थानच्या बॉलिंगसमोर टिकू शकले नाही.
