शिवम दुबे याची विकेट कशी काढली?
राजस्थानच्या जड्डूने एकाच ओव्हरमध्ये दोन विकेट काढल्या अन् चेन्नईला बॅकफूटवर पाठवलं. त्यात सर्वात महत्त्वाची विकेट होती, ती म्हणजे शिवम दुबे याची... शिवम दुबेने फक्त 6 धावा करून बाहेरचा रस्ता पकडला होता. त्याने चार बॉलमध्ये तीन डॉट तर एक सिक्स मारला. अशातच शिवम दुबे याची विकेट कशी काढली? यावर रविंद्र जडेजाने खुलासा केलाय.
advertisement
IPL 2026 : तब्बल 18 वर्षानंतर धोनी पर्वाचा 'द एन्ड', स्वत: CSK ने केली घोषणा, पोस्ट चर्चेत!
मला चांगलंच माहितीये की.... - जडेजा
"शिवम दुबेची आणि माझी चांगली मैत्री आहे. मी शिवम दुबेला गेल्या काही वर्षांपासून चांगलंच ओळखतो. आम्ही एकत्र अनेक मॅच खेळल्यात. त्यामुळे मी त्याला नेट्समध्ये देखील अनेकदा बॉलिंग केली आहे. त्यामुळे तो स्पिनर्सविरुद्ध कसा खेळतो, हे मला चांगलंच माहितीये. मॅचपूर्वी मी त्याच्याविरुद्ध कसं खेळायचं याचा सराव केला होता. त्याला आऊटसाईड ऑफला बॉल टाकायचा प्रयत्न माझा होता", असं रविंद्र जडेजा मॅच जिंकल्यानंतर म्हटलं आहे.
18 रन्स देत दोन विकेट्स
दरम्यान, ऑलराऊंडर रविंद्र जडेजा याने तीन ओव्हर टाकल्या. यामध्ये त्याने फक्त 18 रन्स देत दोन विकेट्स नावावर केल्या. यामध्ये सरफराज खान याची देखील विकेट होती. तर जॉफ्रा आर्चर आणि नांद्रे बर्गर याने देखील दोन विकेट्स नावावर केल्या. तसेच ब्रिजेश शर्मा, संदीप शर्मा आणि रवी बिश्नोई यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने धमाका केला. फक्त 15 बॉलमध्ये त्याने अर्धशतक ठोकून राजस्थानला मॅच जिंकून दिली.
