advertisement

Mumbai Indians : सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळवलं? MI च्या हेड कोचने सांगितलं खरं कारण

Last Updated:

Mahela jayawardene On Suryakumar Yadav : केकेआरविरुद्धच्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा स्टार प्लेयर सूर्यकुमार यादव याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवलं गेलं. अशातच त्याचं कारण हेड कोच महेला जयवर्धने याने सांगितलं आहे.

Mahela jayawardene On Suryakumar Yadav
Mahela jayawardene On Suryakumar Yadav
Suryakumar Yadav as Impact Sub : तब्बल 13 वर्षांचा रेकॉर्ड तोडून मुंबई इंडियन्सने 'पहिली मॅच देवाला' ही परंपरा मोडून काढली आहे. मुंबई इंडियन्सने 13 वर्षानंतर सिझनची पहिली मॅच जिंकली. तसेच सर्वात हायेस्ट रन चेस करून मुंबईने आपली ताकद दाखवली. वर्ल्ड कप चॅम्पियन खेळाडू तसेच कॅप्टन्सने भरलेल्या या टीममध्ये हार्दिक पांड्याला मोठे निर्णय घ्यावे लागले. त्यातील एक निर्णय म्हणजे सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवणं.

200 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग

सूर्यकुमार यादव सध्या फॉर्ममध्ये नसला तरी गेमचेंज करू शकतो, याची कल्पना सर्वांना आहे. अशातच सूर्याला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळवलं गेलं? याचा खुलासा मुंबई इंडियन्सचे हेड कोच महेला जयवर्धने याने केला आहे. सूर्याने 8 बॉलमध्ये 16 धावा करत 200 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. त्यावर बोलताना, सूर्याला दुखापतीमुळे इम्पॅक्ट प्लेयर म्हणून खेळवलं गेलं, असं उत्तर महेला जयवर्धने याने दिलं. त्यावेळी त्याने मोठं वक्तव्य देखील केलंय.
advertisement

सूर्याच्या शरीरात थोडासा ताठरपणा - जयवर्धने

मला आशा आहे की, यावर कोणतीही अनावश्यक चर्चा होणार नाही. संघ खूप आनंदी आहे. सूर्या आमच्या संघात सामील झाला आहे. त्याला हवी असलेली अतिरिक्त विश्रांती देण्यात आली. सूर्याच्या शरीरात थोडासा ताठरपणा आहे. पुढच्या सामन्याला पाच दिवस आहेत. मला फक्त त्याला थोडा अतिरिक्त वेळ द्यायचा होता, असं महेला म्हणाला. सूर्यकुमार शेवटची तीन ते चार ओव्हर फिल्डिंगसाठी तयार होता, पण मी त्याला नकार दिला, असंही जयवर्धने यावेळी म्हणाला.
advertisement

सूर्याला नंबर तीनवर बॅटिंगची संधी

दरम्यान, रोहित शर्मा आणि रायन रिक्ल्टन यांनी चांगली सुरूवात केल्यानंतर शतकीय भागेदारी केली. त्यावेळी रोहित शर्मा मोठा शॉर्ट खेळण्याच्या नादात आऊट झाला. पण पुढं सूर्याला नंबर तीनवर बॅटिंगला संधी मिळाली. सूर्याने 3 फोर मारत चांगली सुरूवात केली खरी पण फॉर्म खराब असल्याने तो पुन्हा गडबडला. मोठा शॉर्ट मारण्याच्या नादात त्याची विकेट गेली. अशातच आता सूर्यकुमार यादव पुढच्या मॅचमध्ये देखील इम्पॅक्ट प्लेयर असणार का? असा सवाल विचारला जात आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
Mumbai Indians : सूर्यकुमार यादवला इम्पॅक्ट प्लेयर म्हणून का खेळवलं? MI च्या हेड कोचने सांगितलं खरं कारण
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement