advertisement

नवी मुंबईत तरुणाचा 12 जणींवर अत्याचार, उच्चभ्रू तरुणींना करायचा टार्गेट, कसा भुलवायचा?

Last Updated:

अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आता नवी मुंबईत देखील महिलांच्या शोषणाचा असाच एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

adarsh mhatre
adarsh mhatre
नाशिक येथील भोंदूबाबा अशोक खरातचं अत्याचार प्रकरण सध्या महाराष्ट्रभर गाजत आहे. त्याचे विविध कारनामे समोर येत आहेत. पीडित महिलांचा आकडा वाढतच चालला आहे. अशोक खरातचं प्रकरण ताजं असताना आता नवी मुंबईत देखील महिलांच्या शोषणाचा असाच एक गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. इथं एका तरुणाने ११ ते १२ तरुणींवर लैंगिक अत्याचार केला आहे. त्याने स्वतःला इस्रोचा शास्त्रज्ञ असल्याचं सांगून डॉक्टर, इंजिनीअर आणि बँक अधिकारी अशा उच्चभ्रू महिलांना जाळ्यात ओढून त्यांच्यावर अत्याचार केला आहे. आरोपी एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने त्यांची आर्थिक लूट देखील केली आहे.
आदर्श म्हात्रे असं आरोपीचं नाव आहे. तो केवळ दहावी पास असून त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक महिलांशी संपर्क साधून त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पोलिसांनी आरोपी म्हात्रेला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोपी आदर्श म्हात्रे याने विवाह जुळवणाऱ्या विविध मॅट्रिमोनिअल वेबसाईट आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपली बनावट प्रोफाइल्स तयार केली होती. कधी तो 'इस्रोचा शास्त्रज्ञ' तर कधी 'पीडब्ल्यूडी' (PWD) मधील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचं सांगायचा. आपलं राहणीमान एखाद्या मोठ्या अधिकाऱ्याप्रमाणे ठेवून तो समोरच्या व्यक्तीवर छाप पाडायचा. विशेषतः उच्चशिक्षित आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या महिलांना तो टार्गेट बनवायचा.
advertisement

'मोडस ऑपरेंडी' कशी होती?

आदर्शची फसवणूक करण्याची पद्धत अतिशय नियोजनबद्ध होती. तो आधी महिलांशी मैत्री करायचा आणि त्यानंतर लग्नाचं आमिष दाखवून त्यांच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करायचा. एकदा विश्वास संपादन केला की, कामाच्या ठिकाणी काही तांत्रिक अडचण आली आहे किंवा पैशांची तातडीची गरज आहे, असं भासवून तो महिलांकडून लाखो रुपये उकळायचा.
advertisement
तपासात असं समोर आलं आहे की, आदर्श एका महिलेकडून लुटलेले पैसे दुसऱ्या महिलेवर प्रभाव टाकण्यासाठी खर्च करायचा. उरलेली मोठी रक्कम तो मौज-मजा करायला, महागड्या वस्तू खरेदी करायला वापरायचा. बराच पैसा तो गोव्यातील कॅसिनोमध्ये देखील उडवायचा. केवळ नवी मुंबईच नव्हे, तर ठाणे, मुंबई, पिंपरी-चिंचवड, नागपूर आणि यवतमाळ अशा महाराष्ट्रातील विविध शहरांतील महिलांची त्याने फसवणूक केली आहे.
advertisement
आदर्श म्हात्रे याच्यावर आतापर्यंत राज्याच्या विविध पोलीस ठाण्यांत ११ गुन्हे दाखल झाले आहेत. नवी मुंबई गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे सापळा रचून त्याला अटक केली. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
नवी मुंबईत तरुणाचा 12 जणींवर अत्याचार, उच्चभ्रू तरुणींना करायचा टार्गेट, कसा भुलवायचा?
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement