आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचा शेवटचा सामना न्यूझीलंडशी झाला तेव्हा साऊथ अफ्रिकेला हृदयद्रावक पराभव पत्करावा लागला होता. ही तीच मॅच होती, ज्यानंतर एबी डिव्हिलियर्ससह साऊथ अफ्रिकेचे सगळेच रडले होते. ऑकलँडमध्ये झालेल्या या सामन्यात न्यूझीलंडने साऊथ अफ्रिकेचा पराभव करत फायनल गाठली होती. रोमांचक झालेल्या या सामन्यात पराभवानंतर साऊथ अफ्रिकेचे सर्वच्या सर्व खेळाडू मैदानातच ढसाढसा रडले होते. तो हाच काळ होता जेव्हा साऊथ अफ्रिकेची टीम जबरदस्त फॉर्ममध्ये होती.
advertisement
हाशीम आमला, क्विंटन डी कॉक, डीव्हिलियर्स, फाफ डु प्लेसिस, डेल स्टेन यांच्यासारख्या तगड्या खेळाडूंची ही टीम आता उरली नाही. पण नव्या दमाच्या खेळाडूंसह साऊथ अफ्रिका 11 वर्षानंतर पहिल्यांदाच न्यूझीलंडविरुद्ध आयसीसीच्या नॉक आऊट स्पर्धेत उतरणार आहे. त्यामुळे 2015 ची जखम भरून काढण्याची मोठी संधी आहे. आज कोलकाताच्या इडन गार्डनवर दोन्ही संघात सामना रंगणार आहे. त्यामुळे आता कोण जिंकणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, अॅडन मार्करम, क्विंटन डी कॉक, रायन रिकलटन आणि डेव्हिड ब्रेविस यांच्यासारख्या खेळाडूंच्या खांद्यावर आज साऊथ अफ्रिकेची जबाबदारी असेल. तर बॉश, मार्को यान्सन, केशव महाराज, लुंगी एन्गेडी यांच्या खांद्यावर बॉलिंगची जबाबदारी असेल तर मार्करम प्लेईंग इलेव्हनमध्ये बदल करणार का? हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल.
