ऐतिहासिक फायनलच्या आदल्या रात्री...
भारतीय महिला टीम आपल्या पहिल्या वनडे वर्ल्ड कप किताब जिंकण्याचे स्वप्न घेऊन मैदानात उतरणार होती. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ऐतिहासिक फायनलच्या आदल्या रात्री भारतीय महिला टीमच्या कॅप्टनला एक खास फोन आला. या फोनने हरमनप्रीतचच नाही तर टीम इंडियाचं देखील भाग्य उजाळलं. हा फोन होता... थेट क्रिकेटच्या देवाचा... म्हणजेच सचिन रमेश तेंडूलकरचा.
advertisement
सचिन तेंडुलकरने फोन केला अन्...
हरमनप्रीतने आयसीसी रिव्ह्यूमध्ये सांगितले की, मॅचच्या आदल्या रात्री, सचिन तेंडुलकरने फोन केला. त्याने त्याचे अनुभव शेअर केले आणि आम्हाला संतुलन राखायला सांगितलं. जेव्हा खेळ वेगाने सुरू असतो, तेव्हा त्याला थोडे हळू करा. त्याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण जेव्हा तुम्ही खूप वेगाने जाता, तेव्हा धडपडण्याची शक्यता असते. हेच आपल्याला होऊन द्यायचं नाही, असं सचिनने सांगितल्याचं हरमनप्रीत म्हणाली.
लहानपणापासून मला भारतची जर्सी...
जेव्हाही आम्ही एकमेकींना पाहतो, तेव्हा आम्ही फक्त 'विश्व चॅम्पियन' म्हणतो. ही एक खूपच वेगळी भावना आहे. आम्हाला अशी भावना कधी येईल याची आम्ही वाट पाहत होतो, असं म्हणत हरमनप्रीतने आपल्या भावना व्यक्त केल्या. माझे आई-वडील तिथे होते. माझ्यासाठी, वर्ल्ड कपची ट्रॉफी त्यांच्यासोबत उंचावणे, हा खूप खास क्षण होता. लहानपणापासून त्यांनी मला भारतची जर्सी घालायची आहे, देशासाठी खेळायचे आहे, टीमचे नेतृत्व करायचे आहे आणि वर्ल्ड कप जिंकायचा आहे, हे मी ठरवलं होतं. ईमानदारीने सांगायचे तर, मी अजूनही याबद्दल विचार करू शकत नाहीये. कदाचित, काही महिन्यांनी मला कळेल की, आम्ही काय साध्य केले आहे, असं हरमनप्रीत कौर म्हणाली.
