सचिन तेंडुलकरने आज, शुक्रवार 29 ऑगस्ट रोजी त्याच्या आईचा वाढदिवस साजरा केला.या वाढदिवसाला त्याचं संपूर्ण कुटुंब उपस्थित होतं.सचिनने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर त्याच्या आईला केक खाऊ घालतानाचा एक फोटो देखील शेअर केला आहे.या फोटोमध्ये सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर, त्याचा मुलगा अर्जुन आणि मुलगी सारा देखील दिसत आहेत.त्याचसोबत तेंडुलकर घराण्याची भावी सून सानिया चांडोक देखील या वाढदिवसाच्या सोहळ्यात उपस्थित आहे.
advertisement
सचिन तेंडुलकरने शेअर केलेल्या फोटोमध्ये तो त्याच्या आईच्या शेजारी उभा आहे.सचिनची आई केक कापत आहे. यासोबत शेअर केलेल्या दुसऱ्या फोटोमध्ये तो त्याच्या आईला केक भरवताना दिसत आहे. संपूर्ण कुटुंब हा क्षण मोठ्या प्रेमाने पाहत आहे. सचिनचे वडील रमेश तेंडुलकर हे मराठी भाषेतील कादंबरीकार आणि कवी होते. सचिनची आई रजनी विमा उद्योगात काम करत होती. आज त्याच्या मुलाने तिचा वाढदिवस संपूर्ण कुटुंबासह साजरा केला आहे.
सचिन तेंडुलकरने त्याच्या आईसाठी मराठी भाषेत एक सुंदर कॅप्शन लिहिले आहे,तुझ्या पोटी जन्माला आलो, म्हणून मी घडलो, तुझा आशीर्वाद होता, म्हणून मी प्रगती करत राहिलो तू खंबीर आहेस, म्हणूनच आम्ही सगळे खंबीर राहिलो वाढदिवसाच्या शुभेच्छा आई! अशा शब्दात त्याने सोशल मीडियावर आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या.
सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा सानिया चांडोकशी लग्न ठरले आहे. सचिनने रेडिटवरही याची पुष्टी केली, जेव्हा एका चाहत्याने सचिनला त्याच्या मुलाच्या नात्याबद्दल विचारले, परंतु आतापर्यंत कुटुंबातील कोणत्याही सदस्याने अर्जुन-सानियाच्या लग्नाचा फोटो शेअर केलेला नाही. सचिनने आतापर्यंत हा कार्यक्रम खाजगी ठेवला आहे. लग्नानंतर सानिया चांडोक कुटुंबातील प्रत्येक कार्यक्रमात दिसली आहे. सानिया सारा तेंडुलकरच्या अकादमीच्या उद्घाटनालाही दिसली होती. आता लग्नापूर्वी अर्जुनची होणारी बायको तिच्या आजीच्या वाढदिवसाला तिच्या सासरच्या घरी आली होती.त्यामुळे या घटनेची प्रचंड चर्चा आहे.