तुमको देखकर एक किलो खून बढाई है मेरा...
काही अभिनेते तुम्हाला लगेचच आवडतात आणि माझ्यासाठी ते धर्मेंद्र जी होते. ज्यांनी त्यांच्या बहुमुखी प्रतिभेने आमचे मनोरंजन केले. जेव्हा मी त्यांना भेटलो तेव्हा पडद्यावरील हे बंधन पडद्याबाहेर अधिक घट्ट झालं, असं सचिन म्हणतो. ते मला नेहमी म्हणायचे, तुमको देखकर एक किलो खून बढाई है मेरा... त्यांची ऊर्जा अविश्वसनीयपणे संसर्गजन्य होती, असंही सचिनने पोस्टमध्ये म्हटलं आहे.
advertisement
सचिनची पोस्ट काय?
माझं हृदय जड झालंय...
धर्मेंद्र यांच्यात एक सहज प्रेम होते, ज्यामुळे त्यांच्या सभोवतालच्या प्रत्येकाला मौल्यवान आणि विशेष वाटायचे. त्यांचा चाहता नसणं अशक्य होतं. आज, त्यांच्या जाण्यानं माझं हृदय जड झालं आहे. ऐसा लगता है जैसे मेरा 10 किलो खून कम हो गया है. धर्मेंद्रजी तुमची आठवण येईल, असं सचिन तेंडूलकरने म्हटलं आहे.
सचिन नेहमीच माझ्या लाडक्या मुलासारखा
दरम्यान, काही वर्षांपूर्वी धर्मेंद्र आणि सचिन तेंडुलकर यांनी एकदा विमानाने एकत्र प्रवास केला होता. धर्मेंद्र यांनी सोशल मीडियावर या भेटीचा फोटो शेअर केला होता. आम्ही विमानात अचानक भेटलो. सचिन नेहमीच मला माझ्या लाडक्या मुलासारखा राहिला आहे, असं धर्मेंद्र यांनी म्हटलं होतं.
