सचिनकडून पहिली प्रतिक्रिया
सचिन तेंडुलकरच्या टीमकडून याबाबतचं प्रसिद्धी पत्रक काढण्यात आलं आहे. 'बीसीसीआयच्या अध्यक्षपदासाठी सचिन तेंडुलकरच्या नावाचा विचार सुरू आहे, तसंच त्याने नामांकन दाखल केलं आहे, अशी वृत्त समोर आल्याचं आमच्या लक्षात आलं आहे, पण अशा कोणत्याही घटना घडलेल्या नाहीत. अशी वृत्त म्हणजे निव्वळ अफवा आहेत', असं सचिन तेंडुलकरच्या टीमकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सचिन तेंडुलकरने स्वतः याबाबत टिप्पणी केली नसली, तरी त्याच्या टीमने मात्र या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.
advertisement
बीसीसीआयच्या निवडणुका या 28 सप्टेंबरला होणार आहेत. ज्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संयुक्त सचिव आणि कोषाध्यक्ष या पदांसाठी मतदान होणार आहे. तर विद्यमान सचिव देवजित सैकिया, संयुक्त सचिव रोहन गौंस देसाई आणि कोषाध्यक्ष प्रभतेज सिंग भाटी हे त्यांच्या पदावर कायम राहतील. बीसीसीआयच्या सभेमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष तसंच आयपीएलच्या अध्यक्षाचीही निवड होणार आहे.
राज्य संघटनांना वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी (एजीएम) त्यांच्या प्रतिनिधींची नावे सादर करण्याची शुक्रवार 12 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. या यादीतून मोठ्या पदांवर कुणाची वर्णी लागणार? याचे संकेत मिळण्याची शक्यता आहे.