नेमकं काय घडलं?
सचिन आणि त्याचा ग्रुप मासाई माराच्या विख्यात अभयारण्यावरून प्रवास करत असताना, त्यांना अचानक वादळाचा सामना करावा लागला. या घटनेची माहिती देताना सचिन म्हणाला, "आम्ही विमानात होतो आणि वादळ आमच्याकडे येताना दिसत होते. आम्हाला नेमके त्याच ठिकाणी उतरायचे होते जिथे आता हे वादळ आहे. आम्ही लँडिंग स्ट्रिपपासून फक्त दोन मैल दूर होतो, पण खराब हवामानामुळे आम्ही उतरू शकलो नाही."
advertisement
दोन वेळा लँडिंग रद्द
खराब हवामानामुळे पायलटला दोन वेळा लँडिंग रद्द करावे लागले. एकदा तर विमान खूप खाली आले होते. अखेर, दुसऱ्या बाजूला असलेल्या धावपट्टीवर विमान सुरक्षितपणे उतरले. पण त्यानंतरही संकट टळले नव्हते. पावसामुळे ते जंगलात अडकून पडले होते. या संपूर्ण घटनेचे वर्णन करताना सचिनने चेहऱ्यावर हसू कायम ठेवले. "आम्ही इथून निघू शकत नाही. आता आम्हाला घेण्यासाठी जीप येत आहेत," असे तो म्हणाला. गंमतीने त्याने पुढे जोडले, "जर जीप रात्री नाही आली तर... मग इथेच जंगलात राहावे लागेल."
पाहा Video
दरम्यान, या तणावपूर्ण परिस्थितीमध्येही सचिनच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि हलकाफुलका अंदाज पाहून चाहत्यांना त्याच्या साहसी वृत्तीची पुन्हा एकदा प्रचिती आली. हा अनुभव सचिनसाठी आयुष्यभर अविस्मरणीय राहील, यात शंका नाही.