TRENDING:

राजाच्या दर्शनाला 'क्रिकेटचा देव', लालबागमध्ये 'वानखेडे'चा माहोल, जुन्या आठवणींनी सचिन इमोशनल!

Last Updated:

भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सचिन तेंडुलकर याच्यासोबत त्याची पत्नी अंजली तसंच मुलगी सारा आणि मुलगा अर्जुनही उपस्थित होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने संपूर्ण कुटुंबासह लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. सचिन तेंडुलकर याच्यासोबत त्याची पत्नी अंजली तसंच मुलगी सारा आणि मुलगा अर्जुनही उपस्थित होते. लालबागच्या राजाचं सहकुटुंब दर्शन घेतल्यानंतर सचिन भावुक झाला, कारण दर्शनानंतर स्क्रीनवर सचिनचा 25 वर्ष जुना फोटो दाखवण्यात आला, ज्यात तो लालबागच्या राजाचं दर्शन घेत आहे. या जुन्या आठवणींनी आपण भावुक झाल्याचं सचिन म्हणाला.
राजाच्या दर्शनाला 'क्रिकेटचा देव', लालबागमध्ये 'वानखेडे'चा माहोल, जुन्या आठवणींनी सचिन इमोशनल!
राजाच्या दर्शनाला 'क्रिकेटचा देव', लालबागमध्ये 'वानखेडे'चा माहोल, जुन्या आठवणींनी सचिन इमोशनल!
advertisement

सचिन तेंडुलकर जेव्हा बाप्पाच्या दर्शनाला आला तेव्हा लालबागच्या राजाच्या मंडपात सचिन सचिन असा जल्लोष भाविकांकडून करण्यात आला. लालबागच्या दर्शनाला आल्यानंतर वानखेडे स्टेडियमसारखा माहोल असल्याचं विचारलं असता, सचिनने ही बाप्पाची कृपा असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.

सचिनच्या मुलाचा साखरपुडा

advertisement

दरम्यान सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याचा साखरपुडा सानिया चांडोकसोबत काहीच दिवसांपूर्वी झाला आहे. स्वत: सचिन तेंडुलकर याने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. एका चाहत्याने सचिनला अर्जुनचा खरंच साखरपुडा झाला आहे का? असा प्रश्न विचारला. यावर सचिनने, 'हो त्याने साखरपुडा केला आहे आणि आम्ही सर्वजण त्याच्या आयुष्यातील नवीन टप्प्यासाठी खूप उत्सुक आहोत', असं उत्तर दिलं.

advertisement

अत्यंत खासगी समारंभामध्ये कुटुंबातील जवळच्या व्यक्तींच्या उपस्थितीमध्ये अर्जुन तेंडुलकर आणि सानिया चांडोक यांचा साखरपुडा पार पडला. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटोही सोशल मीडियावर आले नाहीत, पण दोघांचाही साखरपुडा झाल्याची वृत्त प्रसिद्ध झाली, यावर अखेर सचिन तेंडुलकरने मौन सोडलं.

advertisement

कोण आहे सानिया चांडोक?

सानिया चांडोक ही मुंबईमधील एका सुप्रसिद्ध व्यावसायिक कुटुंबातून येते. सानिया ही प्रसिद्ध उद्योजक रवी घई यांची नात आहे, ज्यांचं हॉस्पिटॅलिटी आणि फुड इंडस्ट्रीमध्ये योगदान आहे. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल आणि ब्रुकलिन क्रीमरी त्यांच्या मालकीचं आहे.

मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
राजाच्या दर्शनाला 'क्रिकेटचा देव', लालबागमध्ये 'वानखेडे'चा माहोल, जुन्या आठवणींनी सचिन इमोशनल!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल